रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील आठवडा बाजार रोड ते धमालणीचा पारकडे जाणाऱ्या रस्त्यामधील डिपी पोल हटवा व इतर प्रलंबित कामे पूर्ण करा, अशी मागणी भाजप जिल्हा चिटणीस परशुराम तथा ढेकणे यांनी केली आहे.
शहरातील आठवडा बाजार ८० फुटी रोड ते धमालणीचा पारकडे जाणाऱ्या रोडच्या सुरवातीला रस्त्यामधील डिपी पोल असल्याकारणाने वाहतुकीला अडथळा होतो. शिवाय रस्ता अरुंद होतो त्यामुळे पटवर्धन शाळेच्या मुलांना जाण्या-येण्यासाठी खुप त्रास होतो. तरी हा डिपी पोल हटविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पटवर्धन हायस्कुल प्रवेशद्वारासमोरील गटारचे प्रलंबित काम पूर्ण करण्यात यावे व नवनीत स्टेशनरीच्या समोरील रस्त्यामधील पोल हा खूप अडचणीचा ठरत असून त्यामुळे तेथे लहान-मोठे अपघात होतात. रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. परंतु, रस्त्याच्या मध्ये पोल असलेमुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे. त्यामुळे तो पोल हलविण्यात यावा आणि नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यात यावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनात भाजपचे दादा ढेकणे यांनी रत्नागिरी नगर परिषद व महावितरणकडे केली आहे. यावेळी भाजपचे योगेश हळदवणेकर, डॉ. ऋषिकेश केळकर, निलेश आखाडे,भालचंद्र साळवी आदी उपस्थित होते.




