• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Saturday, October 17, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार

yogesh by yogesh
July 4, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार

रत्नागिरी : प्रतिनिधी

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी ठरलेले नागपूर येथील ज्येष्ठ विधिज्ञ, अधिवक्ता परिषदेचे मार्गदर्शक आणि विधी क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व अॅड. पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत अधिवक्ता परिषद, रत्नागिरी जिल्हाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात जंगी सत्कार करण्यात आला. रत्नागिरी बार असोसिएशनच्या कार्यक्रमानिमित्त अॅड. पांडे यांचे रत्नागिरीत आगमन झाले असता, त्याचे औचित्य साधून हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र स्टेट लीगल एडच्या सदस्या तसेच अधिवक्ता परिषदेच्या राज्य कार्यकारिणी सदस्या अॅड. प्रिया लोवेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष अॅड. मनोहर जैन यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.

रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या केळकर सभागृहात आयोजित कार्यक्रमाला जिल्ह्यातील अधिवक्ता परिषद सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सत्काराला उत्तर देताना अॅड. पारिजात पांडे यांनी अधिवक्ता परिषद ही केवळ संघटना नसून वकिलांच्या व्यावसायिक उन्नतीबरोबरच न्यायव्यवस्थेतील मूल्यांचे जतन करणारी चळवळ असल्याचे सांगितले. तरुण वकिलांनी सातत्याने अभ्यास, शिस्त आणि समाजाभिमुख दृष्टीकोन जोपासावा, असे आवाहन त्यांनी केले. यानंतर अॅड. पारिजात पांडे यांच्या हस्ते अधिवक्ता परिषद, रत्नागिरी जिल्हा यांच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जिल्हा कार्यकारिणीचे अभिनंदन करून अधिवक्ता परिषदेचे कार्य जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास रत्नागिरीचे जिल्हा सरकारी वकील अनिरुद्ध फणसेकर, भाऊ शेट्ये, अजित वायकुळ, विजय झाडगावकर, असीमा नलावडे, अधिवक्ता परिषदेचे जिल्हा सचिव समीर आठल्ये, तसेच अलिबाग येथील ज्येष्ठ अधिवक्ता श्रीराम ठोसर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात अधिवक्ता परिषदेच्या नव्या जिल्हा कार्यकारिणीला शुभेच्छा देत, संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे वाढविणे, नवोदित वकिलांना मार्गदर्शन करणे आणि समाजाभिमुख विधी उपक्रमांना प्राधान्य देण्याबाबत मोलाच्या सूचना केल्या. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अधिवक्ता परिषदेच्या कार्याला नवसंजीवनी मिळणार असून, विधी क्षेत्रातील संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Tags: बार कौन्सीलवकील
ShareSend
Previous Post

चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन

Next Post

‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!

yogesh

yogesh

Related Posts

आ. किरणभैय्या सामंत यांच्या सहभागाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेला नवी ऊर्जा
माझी रत्नागिरी

आ. किरणभैय्या सामंत यांच्या सहभागाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेला नवी ऊर्जा

October 16, 2026
दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी आ. किरणभैय्या सामंत थेट मैदानात!
माझी रत्नागिरी

दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी आ. किरणभैय्या सामंत थेट मैदानात!

October 16, 2026
वाडवडिलांच्या जमिनीवर एमआयडीसीचा घाला खपवून घेणार नाही : वाटद ग्रामस्थ आक्रमक
माझी रत्नागिरी

वाडवडिलांच्या जमिनीवर एमआयडीसीचा घाला खपवून घेणार नाही : वाटद ग्रामस्थ आक्रमक

October 16, 2026
सायबर पोलिसांची धडक कारवाई, ११ लाखांचा फ्रॉड करणारे दोघे जेरबंद
माझी रत्नागिरी

सायबर पोलिसांची धडक कारवाई, ११ लाखांचा फ्रॉड करणारे दोघे जेरबंद

October 15, 2026
Next Post
‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!

'न्याती'च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us