• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Sunday, June 21, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

कार्यसम्राट आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नांनी अर्जुना परिसरातील रस्ते दुरुस्ती, पाचल-तळवडे पुलासाठी निधी मंजूर

yogesh by yogesh
June 21, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
माझा शब्द, हेच वचन! उक्तीचा राजापूरवासीयांना प्रत्यय

राजापूर : प्रतिनिधी

राजापूर तालुक्याच्या विकासाला गती देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील विविध विकासकामांसाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. कार्यसम्राट आमदार किरण तथा भैय्या सामंत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाला असून, यामुळे अर्जुना प्रकल्प परिसरातील नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती आणि अर्जुना नदीवरील पाचल-तळवडे गावांना जोडणाऱ्या नवीन पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या उभारणीनंतर, प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील अनेक गावांमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर झीज झाली होती. कालवे आणि वितरण व्यवस्था यांच्या कामांमुळे अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले होते, ज्याचा फटका स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांना बसत होता. वाहतुकीसाठी होणारी ही अडचण दूर करण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी जलसंपदा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून विशेष निधीची मागणी केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, अर्जुना प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालवा परिसरातील पांगरी, करक, कारवली, पाचल, तळवडे, रायपाटण, हरळ, विलवडे, रिंगणे, आरगाव आणि परुळे या ११ गावांमधील सुमारे ३० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांमुळे गावांमधील अंतर्गत संपर्क सुधारण्यास मदत होणार असून शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्यांची बऱ्याच काळापासून असणारी गैरसोय दूर होणार आहे.

याशिवाय, पावसाळ्यात अर्जुना नदीला पूर आल्यावर पाचल आणि तळवडे या गावांमधील संपर्क वारंवार तुटत असे. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत होता. येथे एका सुरक्षित आणि कायमस्वरूपी पुलाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. या मागणीची दखल घेत, पाचल-तळवडे गावांना जोडणाऱ्या नवीन पुलाच्या बांधकामासाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी जलसंपदा विभागामार्फत ‘विशेष बाब’ म्हणून उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी आमदार किरण सामंत यांनी शासन स्तरावर सातत्यपूर्ण प्रयत्न केले होते. स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि विविध सामाजिक संघटनांनीही वेळोवेळी या कामांची मागणी केली होती.

या विकासकामामांमुळे अर्जुना प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असून ग्रामीण भागातील संपर्क सुधारण्यास मोठी मदत मिळणार आहे. तसेच नवीन पुलामुळे पावसाळ्यातील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत आमदार किरण सामंत यांचे आभार मानले असून, मंजूर झालेली कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत अशी इच्छा व्यक्त केली आहे.

Tags: किरण सामंतनिधीराजापुर
ShareSend
Previous Post

सामाजिक कार्यकर्ते विजय जैन यांच्या न्यायालयीन पावलामुळेच सफाई ठेक्यांची रक्कम कमी करण्याची सुबुद्धी!

yogesh

yogesh

Related Posts

सामाजिक कार्यकर्ते विजय जैन यांच्या न्यायालयीन पावलामुळेच सफाई ठेक्यांची रक्कम कमी करण्याची सुबुद्धी!
माझी रत्नागिरी

सामाजिक कार्यकर्ते विजय जैन यांच्या न्यायालयीन पावलामुळेच सफाई ठेक्यांची रक्कम कमी करण्याची सुबुद्धी!

June 21, 2026
विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. किरण सामंत
माझी रत्नागिरी

विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. किरण सामंत

June 19, 2026
बाळ मानेंवर चव्हाणांची ‘फुल्ली’; माशी नक्की कुठे शिंकली?
माझं कोकण

बाळ मानेंवर चव्हाणांची ‘फुल्ली’; माशी नक्की कुठे शिंकली?

June 17, 2026
पत्रकार वारिशे हत्याकांड प्रकरणातील आरोपीला खासगी उपचारांना न्यायालयाची परवानगी
माझी रत्नागिरी

पत्रकार वारिशे हत्याकांड प्रकरणातील आरोपीला खासगी उपचारांना न्यायालयाची परवानगी

June 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us