• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Wednesday, August 5, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

पाच हजारांसाठी इमान विकणारा लाचखोर सावर्डेचा सर्कल ‘एसीबी’च्या जाळ्यात!

yogesh by yogesh
August 5, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
पाच हजारांसाठी इमान विकणारा लाचखोर सावर्डेचा सर्कल ‘एसीबी’च्या जाळ्यात!

रत्नागिरी : प्रतिनिधी

जमिनीच्या खरेदीखताची ‘सातबारा’ उताऱ्यावर नोंद करून फेरफार मंजूर करण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सावर्डे (ता. चिपळूण) येथील मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. अनिल दिलीप जाधव (वर्ग ३, महसूल विभाग) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून बुधवारी दुपारी सावर्डे येथील कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली.

कोणत्याही शासकीय कार्यालयात काम करून देण्यासाठी लाचेची मागणी होत असल्यास किंवा भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यास नागरिकांनी घाबरून न जाता निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्र. १०६४ वर किंवा रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधावा. : अविनाश पाटील (पोलीस उपअधीक्षक, एसीबी रत्नागिरी)

मिळालेल्या माहितीनुसार, एका ४८ वर्षीय निवृत्त मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने आपल्या पत्नीच्या नावे मौजे सावर्डे येथे २१८ चौ.मी. जागा खरेदी केली होती. या जागेच्या सातबारा उताऱ्यावर फेरफार नोंदवून तो मंजूर करून घेण्यासाठी त्यांनी सावर्डेचे मंडळ अधिकारी अनिल जाधव यांची भेट घेतली होती. मात्र, हे काम करून देण्यासाठी जाधव याने ५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ३ ऑगस्ट रोजी रत्नागिरी ‘एसीबी’कडे याप्रकरणी लेखी तक्रार नोंदवली.

बुधवारी ‘एसीबी’च्या पथकाने पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी केली असता, मंडळ अधिकारी जाधव याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पथकाने तातडीने सावर्डे येथील मंडळ अधिकारी कार्यालयात सापळा रचला. दुपारी ३:१० वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराकडून ५ हजारांची रक्कम स्वीकारून ती स्वतःजवळील नोटबुकमध्ये ठेवण्यास सांगताना जाधव याला पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात ‘भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यां’तर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

ही यशस्वी कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील व अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सुहास रोकडे यांच्यासह संजय वाघाटे, विशाल नलावडे, दीपक आंबेकर, श्रेया विचारे, हेमंत पवार, राजेश गावकर, समिता क्षीरसागर आणि प्रशांत कांबळे यांचा समावेश होता.

Tags: महसूललाचलाचखोरीलाचलुचपत प्रतिबंधक विभाग
ShareSend
Previous Post

CET Cell च्या पोर्टलवरून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील विधी महाविद्यालये गायब, संस्थाचालकांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थी संभ्रमात!

Next Post

भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल उभारणीला गती देणार : मंत्री नितेश राणे

yogesh

yogesh

Related Posts

भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल उभारणीला गती देणार : मंत्री नितेश राणे
माझी रत्नागिरी

भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल उभारणीला गती देणार : मंत्री नितेश राणे

August 5, 2026
आ. किरण सामंत यांच्या उपस्थितीत शीळ ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या उपस्थितीत शीळ ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

August 4, 2026
जनतेची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा :  आ. किरण सामंत
माझी रत्नागिरी

जनतेची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा : आ. किरण सामंत

August 4, 2026
रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मोफत डायलिसीस सुविधा; रुग्णांना दिलासा
माझी रत्नागिरी

रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मोफत डायलिसीस सुविधा; रुग्णांना दिलासा

August 1, 2026
Next Post
भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल उभारणीला गती देणार : मंत्री नितेश राणे

भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल उभारणीला गती देणार : मंत्री नितेश राणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us