• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Sunday, October 18, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

लाचखोर मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के एसीबीच्या जाळ्यात

yogesh by yogesh
September 2, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
लाचखोर मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के एसीबीच्या जाळ्यात

रत्नागिरी : प्रतिनिधी 

जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर नाव लावण्यासाठी रद्द केलेली फेरफार नोंद मंजूर करण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच घेताना चिपळूणचे मंडळ अधिकारी उमेश राजाराम राजेशिर्के (वय ५२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज रंगेहात ताब्यात घेतले. ही कारवाई सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील पाग नाका, पॉवर हाऊस परिसरात करण्यात आली.

तक्रारदाराने मौजे चिपळूण येथे भूमापन क्रमांक १७४/१अ ही जागा खरेदी केली होती. सदर जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर स्वतःचे व पत्नीचे नाव दाखल होऊन फेरफार मंजूर होण्यासाठी त्यांनी ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यांनी ११ जून २०२६ रोजी फेरफार नोंद घातली होती; मात्र मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के यांनी ८ जुलै २०२६ रोजी ही नोंद रद्द केली. त्यानंतर तक्रारदाराने २ ऑगस्ट रोजी महसूल कर्मचारी पतसंस्थेत राजेशिर्के यांची भेट घेतली असता, रद्द झालेली नोंद मंजूर करण्यासाठी राजेशिर्के यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. पुढे २३ व २७ ऑगस्ट रोजी फोन करून फेरफार नोंद मंजूर केल्याचे सांगत लाचेच्या रकमेसाठी तगादा लावला.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २ सप्टेंबर रोजी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी दीपक लॉजसमोर भोगाळे येथे तक्रारदाराच्या गाडीत पंचांसमक्ष करण्यात आली, ज्यामध्ये लाचेची मागणी निष्पन्न झाली. त्यानंतर सायंकाळी ६:०५ वाजता पाग नाका, पॉवर हाऊस येथील मुंबई-गोवा हायवेवर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराच्या गाडीत येऊन पंचांसमक्ष १० हजार रुपयांची रोख लाच स्वीकारताना पथकाने मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के याला रंगेहात पकडून ताब्यात घेतले. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जमिनीच्या खरेदी खताची सातबारा उताऱ्यावर नोंद करून फेरफार मंजूर करण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सावर्डे (ता. चिपळूण) येथील मंडळ अधिकारी अनिल दिलीप जाधव (वर्ग ३, महसूल विभाग) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५ आॕगस्ट रोजी रंगेहाथ पकडले होते. महिनाभरातील आजची दुसरी कारवाई आहे.

ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे आणि अंमलदार उदय चांदणे, संजय वाघाटे, जनार्दन पवार, आशिष बल्लाळ, श्रेया विचारे, हेमंत राजेश गावकर, समिता क्षिरसागर व अजिंक्य पवार यांनी केली.

Tags: लाचलाचखोरीलाचलुचपत प्रतिबंधक विभाग
ShareSend
Previous Post

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’

Next Post

सायबर पोलिसांची धडक कारवाई, ११ लाखांचा फ्रॉड करणारे दोघे जेरबंद

yogesh

yogesh

Related Posts

आ. किरणभैय्या सामंत यांच्या सहभागाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेला नवी ऊर्जा
माझी रत्नागिरी

आ. किरणभैय्या सामंत यांच्या सहभागाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेला नवी ऊर्जा

October 16, 2026
दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी आ. किरणभैय्या सामंत थेट मैदानात!
माझी रत्नागिरी

दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी आ. किरणभैय्या सामंत थेट मैदानात!

October 16, 2026
वाडवडिलांच्या जमिनीवर एमआयडीसीचा घाला खपवून घेणार नाही : वाटद ग्रामस्थ आक्रमक
माझी रत्नागिरी

वाडवडिलांच्या जमिनीवर एमआयडीसीचा घाला खपवून घेणार नाही : वाटद ग्रामस्थ आक्रमक

October 16, 2026
सायबर पोलिसांची धडक कारवाई, ११ लाखांचा फ्रॉड करणारे दोघे जेरबंद
माझी रत्नागिरी

सायबर पोलिसांची धडक कारवाई, ११ लाखांचा फ्रॉड करणारे दोघे जेरबंद

October 15, 2026
Next Post
सायबर पोलिसांची धडक कारवाई, ११ लाखांचा फ्रॉड करणारे दोघे जेरबंद

सायबर पोलिसांची धडक कारवाई, ११ लाखांचा फ्रॉड करणारे दोघे जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us