• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, November 3, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी

yogesh by yogesh
November 3, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
इसिस दहशतवादी संघटनेशी संबंधित सहा मुस्लिम गजाआड

रत्नागिरी : प्रतिनिधी 

महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रत्नागिरी येथील विशेष न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी आणि १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. चरण चंद्रमणी कांबळे (४२, रा. चाफवली, ता. संगमेश्वर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाने सोमवार, २ नोव्हेंबर रोजी हा निकाल दिला.

आरोपी चरण चंद्रमणी कांबळे हा २०२० मध्ये एका व्यायामशाळेत प्रशिक्षक म्हणून काम करत होता. याचदरम्यान व्यायामासाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीशी त्याची ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत त्याने मुलीशी जवळीक साधली. त्यानंतर पीडिता महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराला धैर्याने सामोरे जात पीडितेने पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील मेघना नलावडे यांनी काम पाहिले. त्यांनी एकूण १२ साक्षीदार तपासले. सादर केलेले पुरावे आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ (२)(जे) आणि ३७६ (२)(एन) अन्वये प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ६ अन्वये २० वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड, तर कलम १० अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त दोन महिने सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या असल्याने आरोपीला प्रत्यक्षात २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनुराधा मेहेर यांनी केला. न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल मोहिते आणि पोलीस कॉन्स्टेबल सुमित पडेलकर यांनी सहकार्य केले.

Tags: आरोपन्यायालयशिक्षा
ShareSend
Previous Post

बंदर विभागाच्या आशिर्वादाने रत्नागिरीत अवैध एलईडी मासेमारी?

yogesh

yogesh

Related Posts

बंदर विभागाच्या आशिर्वादाने रत्नागिरीत अवैध एलईडी मासेमारी?
माझी रत्नागिरी

बंदर विभागाच्या आशिर्वादाने रत्नागिरीत अवैध एलईडी मासेमारी?

October 29, 2026
आ. किरणभैय्या सामंत यांच्या सहभागाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेला नवी ऊर्जा
माझी रत्नागिरी

आ. किरणभैय्या सामंत यांच्या सहभागाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेला नवी ऊर्जा

October 16, 2026
दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी आ. किरणभैय्या सामंत थेट मैदानात!
माझी रत्नागिरी

दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी आ. किरणभैय्या सामंत थेट मैदानात!

October 16, 2026
वाडवडिलांच्या जमिनीवर एमआयडीसीचा घाला खपवून घेणार नाही : वाटद ग्रामस्थ आक्रमक
माझी रत्नागिरी

वाडवडिलांच्या जमिनीवर एमआयडीसीचा घाला खपवून घेणार नाही : वाटद ग्रामस्थ आक्रमक

October 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
imunify-bot-check
error: Content is protected !!

WhatsApp us