• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Friday, October 16, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी आ. किरणभैय्या सामंत थेट मैदानात!

कुरचुंब येथे स्थानिक व्यापारी आणि ग्रामस्थांनी श्रमदानातून साकारला वनराई बंधारा

yogesh by yogesh
October 16, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी आ. किरणभैय्या सामंत थेट मैदानात!

रत्नागिरी : प्रतिनिधी 

निसर्गाने दिलेला पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून उन्हाळ्यातील दुष्काळाच्या झळा कायमस्वरूपी निष्प्रभ करण्यासाठी लांजा तालुक्यातील कुरचुंब येथे सामूहिक श्रमदानाचा एक सुंदर आदर्श उभा राहिला. आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत, स्थानिक लाकूड व्यापारी आणि ग्रामस्थांनी हातात हात घालून श्रमदानातून वनराई बंधारा साकारला. हातांनी उचललेली माती आणि एकवटलेली लोकशक्ती यांच्या संगमातून या भागातील जलसंधारणाच्या कामाला नवा आयाम प्राप्त झाला आहे.

ओढ्या-नाल्यांमधून वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळीत वाढ करणे आणि उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या तीव्र पाणीटंचाईवर मात करणे, या उद्देशाने ही श्रमदानाची मोहीम राबविण्यात आली. आमदार किरण सामंत यांनी स्वतः उपस्थित राहून या मोहिमेत सहभागी ग्रामस्थांचा उत्साह द्विगुणित केला. “पाणी हेच जीवन असून जलसंवर्धनासाठी प्रत्येकाने पुढे येणे काळाची गरज आहे,” असा संदेश देत त्यांनी स्थानिक व्यापारी आणि ग्रामस्थांच्या या एकजुटीचे विशेष कौतुक केले.

याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, लांजा तालुका सभापती मानसी आंबेकर, जिल्हा परिषद सदस्य मनीषा लाखन, चेतन खंदारे, राजू कुरूप, गुरुप्रसाद देसाई, सरपंच प्रसाद माने यांची प्रमुख उपस्थिती होती. केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता स्वतःच्या गावासाठी घाम गाळणाऱ्या ग्रामस्थांचा आणि व्यापाऱ्यांचा उत्साह यावेळी वाखाणण्याजोगा होता. या श्रमदान मोहिमेत लाकूड व्यापारी रामचंद्र झोरे, यशवंत घडशी, संतोष रामाने, अजित बागाव, अक्षय गुरव, सुरेश खानविलकर, सुनील पडयार, नकुल गुरव, अरुण जोशी, मोहन शिंदे, गजानन शिंदे, संजय पिलके, ऋषी राऊत, बबन पवार, अक्षय दाभोळकर, दिलीप शिंदे, संतोष खानविलकर, सीताराम राजीवले, महेंद्र कांबळे, बंडू जाधव, राजा माने, अंकित गुरव, सुनील दाभोळकर, बाळू झोरे, चेतन खंदारे, गणेश लांबोरे, निखिल माने, तानाजी सुवारे, मिलिंद माने यांच्यासह ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सर्व सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ हिरिरीने सहभागी झाले होते.

या बंधाऱ्यामुळे परिसरातील विहिरी आणि बोअरवेलच्या जलपातळीत लक्षणीय वाढ होणार असून, शेतीसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. कुरचुंब गावाने लोकसहभागाच्या बळावर उभ्या केलेल्या या वनराई बंधाऱ्याचे संपूर्ण तालुक्यातून भरभरून कौतुक होत असून, जलसंधारणाची ही चळवळ इतर गावांसाठीही दिशादर्शक ठरत आहे.

Tags: किरण सामंतपाणी योजनाबंधारा
ShareSend
Previous Post

वाडवडिलांच्या जमिनीवर एमआयडीसीचा घाला खपवून घेणार नाही : वाटद ग्रामस्थ आक्रमक

Next Post

आ. किरणभैय्या सामंत यांच्या सहभागाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेला नवी ऊर्जा

yogesh

yogesh

Related Posts

आ. किरणभैय्या सामंत यांच्या सहभागाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेला नवी ऊर्जा
माझी रत्नागिरी

सायबर पोलिसांची धडक कारवाई, ११ लाखांचा फ्रॉड करणारे दोघे जेरबंद
माझी रत्नागिरी

सायबर पोलिसांची धडक कारवाई, ११ लाखांचा फ्रॉड करणारे दोघे जेरबंद

October 15, 2026
लाचखोर मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के एसीबीच्या जाळ्यात
माझी रत्नागिरी

लाचखोर मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के एसीबीच्या जाळ्यात

September 2, 2026
Next Post
आ. किरणभैय्या सामंत यांच्या सहभागाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेला नवी ऊर्जा

आ. किरणभैय्या सामंत यांच्या सहभागाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेला नवी ऊर्जा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us