• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Friday, November 20, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

रत्नागिरीकरांच्या जीवाशी खेळ; डेंग्यूच्या विळख्यात शहर, तरीही यंत्रणा आणि बिल्डर सुस्तच!

yogesh by yogesh
November 20, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
रत्नागिरीकरांच्या जीवाशी खेळ; डेंग्यूच्या विळख्यात शहर, तरीही यंत्रणा आणि बिल्डर सुस्तच!

रत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यात डेंग्यूने अक्षरशः कहर माजवला असून आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. गेल्या नऊ महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ९२ रुग्ण आढळले असून, यातील ५२ रुग्ण एकट्या रत्नागिरी तालुक्यातील आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षभरात जिल्ह्यात केवळ ४२ रुग्ण होते; यंदा हा आकडा दुपटीहून अधिक झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट होत आहे. अर्धवट बांधकामे, साचलेले पाणी आणि भंगार-टायर विक्रेत्यांचा बेजबाबदारपणा नागरिकांच्या जीवावर उठला आहे. आता खुद्द जिल्हा हिवताप कार्यालयानेच नगरपालिकेला पत्र धाडून बेफिकीर बांधकाम व्यावसायिकांवर दंडाचा बडगा उगारण्याची मागणी केली आहे.

सन २०२६ मध्ये ऑक्टोबरअखेरपर्यंत ५५६ संशयितांची तपासणी करण्यात आली, त्यातील ९२ जण डेंग्यूबाधित निघाले. ऑगस्टमध्ये १८, सप्टेंबरमध्ये ३९ आणि ऑक्टोबरमध्ये २३ रुग्णांची भर पडली. नोव्हेंबरच्या पहिल्या पाच दिवसांत १५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असले, तरी धोका टळलेला नाही. आरोग्य विभागाने जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

‘प्रथम नागरिक’च डेंग्यूच्या विळख्यात; शहरातील चर्चेला उधाण! : रत्नागिरी शहरात डेंग्यूने अक्षरशः थैमान घातले असतानाच, आता रत्नागिरीचे ‘प्रथम नागरिक’च डेंग्यूच्या विळख्यात सापडल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे. सामान्य नागरिकांसोबतच आता शहराचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीलाच या आजाराने गाठल्याने आरोग्याच्या मुद्द्यावरून उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहे. शहरातील अर्धवट बांधकामे, साचलेले पाणी आणि अस्वच्छतेचा फटका खुद्द प्रथम नागरिकालाच बसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. “प्रथम नागरिकांचीच ही अवस्था, तर सामान्य रत्नागिरीकरांचे काय?” असा खोचक सवाल आता नागरिकांमधून विचारला जात असून, या घटनेमुळे नगरपालिका प्रशासन खडबडून जागे होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तांबटआळीतील सॅक्रेड हार्ट शाळेच्या परिसरात ६ रुग्ण सापडले असून, मस्कर दवाखान्याशेजारील अर्धवट बांधकामात साचलेले पाणी डासांची पैदास करणारे केंद्र ठरले आहे. दुसरीकडे, पोलिस लाईन परिसरातील मोठ्या बांधकामांवर राबणारे मजूरही डेंग्यूच्या तावडीत सापडले आहेत. मजुरांच्या वस्तीतील अस्वच्छता आणि बांधकामाच्या लोखंडी प्लेट्समध्ये साचलेल्या पाण्यात डासांची अंडी जोमाने वाढत आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे, वारंवार तंबी देऊनही काही मस्तवाल बांधकाम ठेकेदार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे या बांधकाम व्यावसायिकांना तात्काळ नोटिसा बजावाव्यात, धूर व अळीनाशक फवारणी करावी आणि डासांच्या अळ्या आढळल्यास थेट दंडात्मक कारवाई करावी, असे खडे बोल जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्राद्वारे सुनावले आहेत. यासोबतच, उघड्यावर टायर्स, प्लास्टिक आणि भंगार टाकून पाणी साचवणाऱ्या विक्रेत्यांनाही परिसर कोरडा ठेवण्याची तंबी दिली आहे.

डेंग्यूच्या या डासांनी आता सामान्य नागरिकांसोबतच रत्नागिरीतील काही राजकीय लोकप्रतिनिधींनाही गाठले आहे. लोकप्रतिनिधींनाच लागण झाल्याने परिस्थितीचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना अर्धवट बांधकामांतील साचलेल्या पाण्याकडे होणारे दुर्लक्ष संतापजनक आहे. आता तरी रत्नागिरी नगरपालिका कुंभकर्णी झोपेतून जागी होऊन दोषींवर कठोर कारवाई करणार का, असा संतप्त सवाल रत्नागिरीकर विचारत आहेत.

Tags: आरोग्यडासडेंग्यूरत्नागिरीसाथ
ShareSend
Previous Post

बंदर विभागात ‘एसीबी’चा धमाका; ६० हजारांची लाच घेताना वर्ग-१ अधिकाऱ्यासह खासगी पंटर जाळ्यात

yogesh

yogesh

Related Posts

बंदर विभागात ‘एसीबी’चा धमाका; ६० हजारांची लाच घेताना वर्ग-१ अधिकाऱ्यासह खासगी पंटर जाळ्यात
माझी रत्नागिरी

बंदर विभागात ‘एसीबी’चा धमाका; ६० हजारांची लाच घेताना वर्ग-१ अधिकाऱ्यासह खासगी पंटर जाळ्यात

November 17, 2026
इसिस दहशतवादी संघटनेशी संबंधित सहा मुस्लिम गजाआड
माझी रत्नागिरी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी

November 3, 2026
बंदर विभागाच्या आशिर्वादाने रत्नागिरीत अवैध एलईडी मासेमारी?
माझी रत्नागिरी

बंदर विभागाच्या आशिर्वादाने रत्नागिरीत अवैध एलईडी मासेमारी?

October 29, 2026
आ. किरणभैय्या सामंत यांच्या सहभागाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेला नवी ऊर्जा
माझी रत्नागिरी

आ. किरणभैय्या सामंत यांच्या सहभागाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेला नवी ऊर्जा

October 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
imunify-bot-check
error: Content is protected !!

WhatsApp us