• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, August 4, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

जनतेची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा : आ. किरण सामंत

लांजा तहसीलदार कार्यालयाला अचानक भेट, कामांचा घेतला आढावा

yogesh by yogesh
August 4, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
जनतेची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा :  आ. किरण सामंत

लांजा : प्रतिनिधी 

लांजा-राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी मंगळवारी सकाळी अचानक लांजा तहसीलदार कार्यालयाला भेट देत महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. या अचानक झालेल्या भेटीमुळे कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. प्रलंबित महसूल प्रकरणांची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना ती तातडीने निकाली काढण्याचे स्पष्ट निर्देश आमदार सामंत यांनी दिले.

यावेळी आमदार सामंत यांनी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागातील छोट्या-मोठ्या कामांसाठी वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. नागरिकांना वेळेत न्याय मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, कोणत्याही नागरिकाला विनाकारण हेलपाटे मारायला लावले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला छोट्या-मोठ्या कामांसाठी कार्यालयाच्या फेऱ्या मारायला लावू नका. नागरिकांची कामे वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करा. कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. : आ. किरण सामंत 

भेटीदरम्यान महसूल विभागातील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. काही महत्त्वाच्या प्रकरणांवर तात्काळ निर्णय घेऊन ती मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांकडून आलेल्या तक्रारी, जमीनविषयक प्रकरणे, दाखले, नामांतरण, फेरफार तसेच इतर महसूल विषयक अर्जांची माहितीही त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. कार्यालयात उपस्थित असलेल्या नागरिकांशीही आमदार सामंत यांनी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देत नागरिकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्यास सांगितले.

अधिकाऱ्यांनीही प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले. अचानक झालेल्या या पाहणीमुळे महसूल विभागातील कामकाजाला अधिक गती मिळणार असून नागरिकांची रखडलेली कामे लवकर मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.आमदार किरण सामंत यांच्या या धडक पाहणीमुळे महसूल प्रशासन अधिक जबाबदारीने काम करेल आणि सर्वसामान्य नागरिकांना वेळेत न्याय मिळेल, असा विश्वास तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केला.

Tags: किरण सामंतलांजा
ShareSend
Previous Post

रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मोफत डायलिसीस सुविधा; रुग्णांना दिलासा

Next Post

आ. किरण सामंत यांच्या उपस्थितीत शीळ ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

yogesh

yogesh

Related Posts

आ. किरण सामंत यांच्या उपस्थितीत शीळ ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या उपस्थितीत शीळ ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

August 4, 2026
रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मोफत डायलिसीस सुविधा; रुग्णांना दिलासा
माझी रत्नागिरी

रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मोफत डायलिसीस सुविधा; रुग्णांना दिलासा

August 1, 2026
नाटे ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो ग्रामस्थ शिंदेंच्या शिवसेनेत
माझी रत्नागिरी

नाटे ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो ग्रामस्थ शिंदेंच्या शिवसेनेत

August 1, 2026
आ. किरण सामंतांकडून धोकादायक आंबा घाटाची पाहणी
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंतांकडून धोकादायक आंबा घाटाची पाहणी

August 1, 2026
Next Post
आ. किरण सामंत यांच्या उपस्थितीत शीळ ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

आ. किरण सामंत यांच्या उपस्थितीत शीळ ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us