• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Friday, June 19, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. किरण सामंत

yogesh by yogesh
June 19, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. किरण सामंत

राजापूर : प्रतिनिधी

शहरातील सुरू असलेली, मंजूर झालेली तसेच प्रस्तावित विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी गुरुवारी राजापूर शासकीय विश्रामगृहात नगराध्यक्ष, नगरसेवक आणि नगर परिषद प्रशासनाची विशेष बैठक घेतली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी कमी पडू देणार नसून प्रस्तावित विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

बैठकीत शासनाच्या विविध योजनांतर्गत शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कामांचा दर्जा कायम राखत ती निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आ. सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच शासनस्तरावर मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या प्रगतीबाबत माहिती घेत आवश्यक मार्गदर्शन केले.

यावेळी नगर परिषदेच्या विविध प्रस्तावित विकासकामांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये नवीन नगर परिषद प्रशासकीय इमारतीसाठी १५ कोटी रुपये, बहुउद्देशीय सभागृहासाठी ३ कोटी रुपये, मच्छी व मटण मार्केट उभारणीसाठी ३ कोटी रुपये, सफाई कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान व कंपाऊंड वॉलसाठी १ कोटी रुपये तसेच नगर परिषदेच्या मालकीच्या शाळांची दुरुस्ती, तळी स्वच्छता आणि उद्यानांचे सुशोभीकरण यासाठी ३ कोटी रुपयांच्या प्रस्तावांचा समावेश आहे.

या सर्व विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्यासमवेत बैठक घेऊन आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन आ. किरण सामंत यांनी दिले. शहराच्या विकासाला गती देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बैठकीस नगराध्यक्ष ॲड. हुस्नबानू खलिफे, उपनगराध्यक्ष विनय गुरव, काँग्रेस गटनेते ॲड. जमीर खलिफे, शिवसेना गटनेते ॲड. राहुल तांबे, मुख्याधिकारी अभिजित कुंभार तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या विविध नागरी समस्यांवर आणि विकासकामांशी संबंधित प्रश्नांवर बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

Tags: किरण सामंतराजापूरविकासकामे
ShareSend
Previous Post

बाळ मानेंवर चव्हाणांची ‘फुल्ली’; माशी नक्की कुठे शिंकली?

yogesh

yogesh

Related Posts

बाळ मानेंवर चव्हाणांची ‘फुल्ली’; माशी नक्की कुठे शिंकली?
माझं कोकण

बाळ मानेंवर चव्हाणांची ‘फुल्ली’; माशी नक्की कुठे शिंकली?

June 17, 2026
पत्रकार वारिशे हत्याकांड प्रकरणातील आरोपीला खासगी उपचारांना न्यायालयाची परवानगी
माझी रत्नागिरी

पत्रकार वारिशे हत्याकांड प्रकरणातील आरोपीला खासगी उपचारांना न्यायालयाची परवानगी

June 16, 2026
जो मै बोलता हू, वो मै डेफिनेटली करता हू! आ. किरण सामंतांनी स्वखर्चाने तयार केला माऊली घाट
माझी रत्नागिरी

जो मै बोलता हू, वो मै डेफिनेटली करता हू! आ. किरण सामंतांनी स्वखर्चाने तयार केला माऊली घाट

June 14, 2026
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझी रत्नागिरी

पूर्णगड पोलीस हद्दीत कारवाईपूर्वीच ‘टिप’ मिळत असल्याने दारू विक्रेते सुसाट

June 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us