• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, September 1, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन

yogesh by yogesh
July 4, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी 

चिपळूण नागरी पतसंस्थेची सहकार विभागामार्फत सुरू असलेली चौकशी राजकीय दबावापोटी अचानक स्थगित केल्याच्या निषेधार्थ संस्थेच्या सभासदांनी थेट विधानभवनाबाहेर धडक दिली. आंदोलकांनी विधानभवनाबाहेर जोरदार निदर्शने करत सरकारचे लक्ष वेधून घेतले. यावेळी आंदोलकांनी हातात बॅनर झळकावत सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार प्रवीण दरेकर आणि फडणवीस सरकारचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. या प्रकरणी तात्काळ न्याय न मिळाल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही सभासदांनी दिला आहे.

चिपळूण नागरी पतसंस्थेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत संस्थेचे सभासद विकास हादवे आणि अकबर शिकलकर यांनी सहकार विभागाकडे पुराव्यांसह रीतसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत सहकार विभागाने एक चौकशी समिती गठीत केली होती व त्याद्वारे कसून चौकशी सुरू करण्यात आली होती. प्राथमिक चौकशीदरम्यान तक्रारदारांच्या आक्षेपानुसार समितीला काही गंभीर त्रुटी आणि गैरव्यवहार आढळून आले होते. त्यामुळे या चौकशीच्या अंतिम अहवालाची सर्वांनाच प्रतीक्षा होती.

राजकीय दबावाचा आरोप आणि आमदारांची कबुली

चौकशी अंतिम टप्प्यात असतानाच सहकार विभागाने अचानक या सुरू असलेल्या चौकशीला स्थगिती दिली आणि कोणताही अहवाल न देताच चौकशी थांबवली. विशेष म्हणजे, दरम्यानच्या काळात संस्थेच्या एका जाहीर कार्यक्रमात भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आपणच ही चौकशी थांबवली असल्याची जाहीर कबुली दिली होती. या प्रकारावर तक्रारदार सभासदांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, राजकीय दबावापोटी चौकशी थांबवून पतसंस्थेतील गैरकारभाराला पाठीशी घातले जात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.

यापूर्वी, या प्रकरणी योग्य कारवाई व्हावी यासाठी ४ मे रोजी विकास हादवे आणि अकबर शिकलकर यांनी चिपळूण नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यावेळी जिल्हा उपनिबंधक (सहकार) कार्यालयाकडून कायदेशीर व ठोस कारवाईचे लेखी आश्वासन मिळाल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र, या घटनेला ५० दिवस उलटून गेल्यानंतरही सहकार विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. अखेर सहकार विभागाच्या या ढिसाळ कारभाराला कंटाळून आणि सरकारसह विरोधकांचे लक्ष वेधण्यासाठी आज थेट विधानभवनाबाहेर आंदोलन करण्यात आले. विधानभवनाबाहेर झालेल्या या आंदोलनात तक्रारदार विकास हादवे आणि अकबर शिकलकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या राधा लवेकर आणि मानवाधिकार कार्यकर्ते अनिकेत साळवी आदी प्रामुख्याने सहभागी झाले होते.

“सहकार क्षेत्रात सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहिले पाहिजेत. राजकीय दबावाखाली जर चौकशी दडपली जात असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. सहकार विभागाने यावर तातडीने आणि योग्य ती कारवाई न केल्यास आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत,” असा इशारा आंदोलकांनी माध्यमांशी बोलताना दिला. या आंदोलनामुळे विधानभवन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Tags: गैरव्यवहारचिपळूण नागरी पतसंस्थाप्रशांत यादवभाजपभाजपा जिल्हाध्यक्ष
ShareSend
Previous Post

गोहत्या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांची पोलिस अधिक्षक कार्यालयावर धडक

Next Post

‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार

yogesh

yogesh

Related Posts

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’
माझी रत्नागिरी

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’

August 21, 2026
आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!
माझी रत्नागिरी

आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!

August 18, 2026
रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!
माझी रत्नागिरी

रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!

August 14, 2026
जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण
माझी रत्नागिरी

जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

August 10, 2026
Next Post
‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार

'बार कौन्सिल'च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us