• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, September 1, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!

४० कोटी खर्चूनही रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे छत दुसऱ्यांदा पत्त्यासारखे कोसळले; कंत्राटदाराला ‘ब्लॅक लिस्ट’ करण्याची जनतेची आक्रमक मागणी

yogesh by yogesh
July 6, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!

रत्नागिरी : प्रतिनिधी 

‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून चकचकीत करण्यात आलेल्या रत्नागिरी रेल्वे स्थानकाची सुरक्षितता उघड्यावर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ‘न्याती’ या कंत्राटदार कंपनीला या स्थानकाच्या पुनर्विकास आणि सुशोभीकरणाचे काम देण्यात आले होते. या कामासाठी सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, सोमवारी या सुशोभित भागाचे छत (सिलिंग) अचानक पत्त्यासारखे कोसळल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे छत कोसळण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी उद्घाटनापूर्वीही एकदा हे छत अशाच प्रकारे कोसळले होते. एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा छत कोसळल्यामुळे कंत्राटदार कंपनीच्या ‘डुप्लिकेट’ कामाची ख्याती आता समोर आली आहे.

‘न्याती’ कंपनीला काळ्या यादीत टाका! : एकदा दुर्घटना घडूनही ढिम्म प्रशासनाने आणि कंत्राटदाराने त्याकडे डोळेझाक केल्यामुळे, प्रशासनाचा कंत्राटदारावर वरदहस्त असल्याचा संशय बळावला आहे. कोट्यवधी रुपयांच्या या विकासकामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.परिसरात विकासकामांच्या नावाखाली रस्त्यांचा पुरता बोजवारा उडवणाऱ्या ‘न्याती’ कंत्राटदार कंपनीला तातडीने ‘ब्लॅक लिस्ट’ (काळ्या यादीत) करण्याची मागणी आता जनतेतून जोर धरू लागली आहे. रेल्वे स्थानकाचे सिलिंग दोनदा कोसळल्याने या कंपनीच्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश झाला असून, अशा बेजबाबदार कंत्राटदारावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असा आक्रमक सूर रत्नागिरीकरांमधून उमटत आहे.

कोकणात दरवर्षी कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा अंदाज आणि येथील भौगोलिक परिस्थितीची पूर्ण जाणीव असतानाही, अत्यंत निष्काळजीपणे आणि बेजबाबदारपणे हे काम करण्यात आल्याचे या घटनेने सिद्ध केले आहे. पहिल्या दुर्घटनेनंतर कंत्राटदार आणि प्रशासनाने कोणताही धडा घेतला नाही. केवळ वरवरची मलमपट्टी करून काम उरकण्यात आल्यामुळेच आज दुसऱ्यांदा हा प्रकार घडला असून, हा प्रवाशांच्या जीवाशी चाललेला थेट खेळ आहे. सोमवारी ज्यावेळी सिलिंगचा मोठा भाग अचानक खाली आला, त्यावेळी सुदैवाने तिथे प्रवाशांची गर्दी नव्हती. केवळ नशिबाची साथ म्हणून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही व कोणीही जखमी झाले नाही. मात्र, रेल्वे स्थानक हे २४ तास गजबजलेले मध्यवर्ती ठिकाण असल्याने, एखादी गाडी आल्याच्या वेळी ही घटना घडली असती तर याला जबाबदार कोण राहिले असते, असा संतप्त सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे. एकदा दुर्घटना घडूनही ढिम्म प्रशासनाने आणि कंत्राटदाराने त्याकडे डोळेझाक केल्यामुळे, प्रशासनाचा कंत्राटदारावर वरदहस्त असल्याचा संशय बळावला आहे. कोट्यवधी रुपयांच्या या विकासकामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Tags: उदय सामंतकिरण सामंतन्यातीबांधकाम विभागभाजपरवींद्र चव्हाणशिवसेना
ShareSend
Previous Post

‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार

Next Post

आ. भैय्या सामंत इफेक्ट : लांजा शहराच्या विकासासाठी २० कोटी मंजूर

yogesh

yogesh

Related Posts

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’
माझी रत्नागिरी

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’

August 21, 2026
आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!
माझी रत्नागिरी

आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!

August 18, 2026
रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!
माझी रत्नागिरी

रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!

August 14, 2026
जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण
माझी रत्नागिरी

जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

August 10, 2026
Next Post
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!

आ. भैय्या सामंत इफेक्ट : लांजा शहराच्या विकासासाठी २० कोटी मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us