• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Wednesday, September 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

‘रत्नागिरी विधानसभा’तून ४० हजारांचे मताधिक्य देऊ : बाळ माने

yogesh by yogesh
May 8, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी भाजपाने गेल्या दीड वर्षांपासून गाव चलो, घर चलो अभियान, मेरा बूथ सबसे मजबूत या अभियानाच्या अंतर्गत भाजपाने लोकसभा निवडणुकीची तयारी केली. त्यामुळे बूथकमिट्या पूर्ण करण्यात आल्या. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने राबवलेल्या योजनांचा लाभ कोट्यवधी जनतेला मिळाला आहे. त्यामुळे हे सर्व मतदार भाजपाला मतदान करतात. या सर्व योजनांची माहिती व विकासयोजनांची माहिती देणारी पत्रके घरोघरी वाटल्यामुळे यावेळेस मतदारांमध्ये उत्साह असून महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री, नारायण राणे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ४० हजारांचे मताधिक्य देऊ, असा दावा भाजपाचे लोकसभा सहप्रभारी बाळ माने यांनी केला.
रत्नागिरी शहर, मिऱ्या, मिरजोळे, कुवारबाव यासह विविध ठिकाणच्या महायुतीच्या बूथवर श्री. माने यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, महायुतीतील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, रिपाईंसह अन्य पक्षांचे कार्यकर्ते एकत्रित प्रचार करत होते. केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांची विराट सभा रत्नागिरीत झाली. त्याचा चांगला परिणाम मतदारांवर झाला असून महायुतीचा माहोल तयार झाला.
बाळ माने यांनी गाव चलो घर चलो अभियानासंबंधी सांगितले की, वरिष्ठांच्या आदेशानुसार हे अभियान सुरू केले. लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी आम्ही आधीपासूनच नियोजन केले. कमळाच्या निशाणीवर उमेदवार मिळणे ही महत्त्वाची गोष्ट होती. महायुतीतील वरिष्ठांनी त्याबाबत निर्णय घेतला आणि नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली. प्रचाराकरिता दिवस कमी होते. परंतु घरोघरी कमळ व मोदी सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी आम्ही वर्षभर मेहनत घेत होतो. मेरा बूथ सबसे मजबूत, बुथ जितेगा चुनाव जितेगा या तत्त्वानुसार बूथ कमिटी करण्यात आली. त्यांच्या बैठका घेतल्या, आपण मतदानात काय केले पाहिजे, याकरिता प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्यामुळे सगळ्या बूथवर भाजपा कार्यकर्ते पाहायला मिळाले. त्यांना महायुतीतील सर्व पक्षांचे कार्यकर्तेही मदतीला आले. त्यामुळे सर्व ठिकाणी बूथ लागले.

Tags: ४००पारbjpDevendra fadanviskonkanmaharastranarayan Rane
ShareSend
Previous Post

भाजपचे नारायण राणे करणार ‘वन टू का फोर’

Next Post

प्रश्न विजयाचा नव्हे तर मताधिक्याचा!

yogesh

yogesh

Related Posts

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’
माझी रत्नागिरी

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’

August 21, 2026
आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!
माझी रत्नागिरी

आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!

August 18, 2026
रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!
माझी रत्नागिरी

रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!

August 14, 2026
जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण
माझी रत्नागिरी

जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

August 10, 2026
Next Post

प्रश्न विजयाचा नव्हे तर मताधिक्याचा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us