मतदानाच्या टक्क्यात वाढ, विनायक राऊत यांना धक्का
रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी आज सर्वत्र शांततेत आणि सुरळीत अंदाजे ६५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४ लाख ८ हजार ७४५ इतक्या पुरुष तर ३ लाख ९८ हजार ८१६ इतक्या महिला अशा एकूण ८ लाख ७ हजार ५६२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या टक्क्यात वाढ झाल्याने विनायक राऊत यांना धक्का बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१९ च्या लोकसभा मतदानाची टक्केवारी ६१.९९ टक्के इतकी होती. त्या तुलनेत निश्चितच यावेळी मतदानात चांगली वाढ झाल्याचा अंदाज आहे. तुलना करता इंडी आघाडीचे राजापूर आणि कुडाळ या दोन्ही मतदारसंघात इंडी आघाडीला धक्का देण्यात आल्याची चर्चा आहे. चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी हे मतदारसंघ महायुतीकडे असल्याने इथे मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे प्रस्थापितांना धक्का बसून महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे वन टू का फोर करणार आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी काही भागात सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. काही भागात ११ वाजेपर्यंत मतदान रोडावले होते. दुपारी ३ वाजल्यानंतर मतदानाचा टक्का वाढला. प्रशासनाने उन्हाची तिव्रता लक्षात घेऊन मंडप, पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प आदींची सुविधा केली होती. त्यामुळे मतदारंनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला. सांयकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या मतदानामध्ये चिपळूण विधानसभा– ६९ हजार ७८३ पुरुष, ७२ हजार १७५ महिला असे एकूण १लाख ४१ हजार ९५८ (५२.६२ टक्के), रत्नागिरी विधानसभा– ८० हजार ७०२ पुरुष, ८२हजार २२४ महिला, इतर १ असे एकूण १ लाख ६२ हजार ९२७,(५७.४६ टक्के), राजापूर विधानसभा – ५३ हजार ९७१ पुरुष, ५६ हजार ६०४महिला असे एकूण १ लाख १० हजार ५७५, (४७.३१टक्के), कणकवली विधानसभा – ६४हजार ७८९ पुरुष, ६० हजार ७८३महिला असे एकूण १ लाख २५ हजार ५७२,(५५.१४टक्के), कुडाळ विधानसभा – ६७हजार ६३३ पुरुष, ६१ हजार ८१७ महिला असे एकूण १ लाख २९ हजार ४५०, (६०.९६ टक्के), सावंतवाडी विधानसभा – ७१ हजार ८६७ पुरुष, ६५हजार २१३ महिला असे एकूण १लाख ३७ हजार ८०, (६१.०७टक्के).
लोकसभा मतदार संघातील एकूण १४ लाख ५१ हजार ६३० मतदारांपैकी ८ लाख ७ हजार ५६२ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क सायंकाळी ५ वाजेपर्यंत बजावला. ही एकूण टक्केवारी ५५.६३ आहे. अंतिम आकडेवारी रात्री उशीरापर्यंत येण्याची शक्यता असून, ६५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. २०१९ च्या लोकसभा मतदानाची टक्केवारी ६१.९९ टक्के इतकी होती. त्या तुलनेत निश्चितच यावेळी मतदानात चांगली वाढ झाल्याचा अंदाज आहे.
लोकसभा मतदार संघात सांयकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदान प्रक्रियेत एकूण १ बीयु, १ सीयु आणि १६ व्हीव्हीपॅट बदलाव्या लागल्या. यात चिपळूण –व्हीव्हीपॅट ३, रत्नागिरी –१ व्हीव्हीपॅट , राजापूर – बीयु१, सीयु१, व्हीव्हीपॅट २, कणकवली –व्हीव्हीपॅट ५, कुडाळ –व्हीव्हीपॅट ३, सावंतवाडी –व्हीव्हीपॅट २ असे बदल करण्यात आले.