• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

रत्नकन्येचे ‘अब तक ५२’

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत स्वरा साखळकरला २ सुवर्ण

yogesh by yogesh
December 20, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0
रत्नकन्येचे ‘अब तक ५२’

रत्नागिरी : प्रतिनिधी

तायक्वांदो असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने तायक्वांदो अकॅडमी ऑफ वास्को आयोजित ही स्पर्धा पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इनडोर स्टेडियम पेडम म्हापसा गोवा येथे दि. १२ ते १५ डिसेंबर २०२४ या कालावधीत मोठ्या दिमाखात पार पडली. देशभरातून नागालँड ते तामिळनाडू आणि पंजाब ते आसाम अशा विविध राज्यातून अनेक खेळाडू या स्पर्धेसाठी गोव्यामध्ये दाखल झाले होते. रत्नकन्या स्वरा साखळकर हिने या स्पर्धेत २ सुवर्ण पदके पटकावून रत्नागिरीच्या शिरपेचात तुरा खोवला आहे.आजपर्यंत स्वरा हिने जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत एकूण ५२ पदके पटकावली आहेत.

रत्नागिरीची सुवर्णकन्या आणि एसआरके तायकॉन्दो संस्थेची खेळाडू स्वरा विकास साखळकर हिची कामगिरी उल्लेखनीय ठरली. जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत कायम आपला ठसा उमटवणाऱ्या स्वरा हिने राष्ट्रीय स्पर्धेत ही आपला दबदबा कायम ठेवला.सर्वप्रथम क्युरोगी प्रकारात आक्रमक खेळ करत विरोधी खेळाडूंची धुळधाण उडवत तिने सुवर्ण पदकाची कमाई केली. तर पुमसे प्रकारात नागालँडच्या खेळाडूचा पराभव करत दुसरे सुवर्णपदक आपल्या नावावर केले. आजपर्यंत स्वरा हिने जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणी राष्ट्रीय स्पर्धेत एकूण ५२ मेडल मिळवली आहेत.

या स्पर्धेसाठी स्वरा हिने अथक मेहनत घेऊन रत्नागिरीचा झेंडा अटकेपार रोवला.आई साक्षी साखळकर तसेच अनेक राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवणारे आणी एसआरके तायकॉन्दो क्लबचे मुख्य प्रशिक्षक शाहरुख सर यांचे स्वरा हिला मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्वरा ही दामले शाळेची विद्यार्थिनी असून इयत्ता ६वीमध्ये शिकत आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. तायकॉन्दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ.अविनाश बारजगे, महासचिव मिलिंद पाठारे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे,खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्हा सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायकॉन्डो प्रशिक्षक प्रशांत मकवाना, मिलिंद भागवत क्लब उपाध्यक्ष अमोल सावंत सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य विरेश मयेकर,निखिल सावंत, कांचन काळे यांनी स्वराचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. स्वराने मिळवलेल्या या यशामुळे आईबाबांसोबतच रत्नागिरीचे नाव रोशन केले आहे.

Tags: कामगिरीक्रीडाराष्ट्रीयस्वरा साखळकर
ShareSend
Previous Post

महाराष्ट्र आता थांबणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

उद्योगमंत्री उदय सामंत यांना डीवाय पाटील विद्यापीठाची डि. लिट. पदवी

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
रत्नागिरीत ज्ञानदान चांगले : उदय सामंत

उद्योगमंत्री उदय सामंत यांना डीवाय पाटील विद्यापीठाची डि. लिट. पदवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us