• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Wednesday, April 15, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

उद्योगमंत्री उदय सामंत यांना डीवाय पाटील विद्यापीठाची डि. लिट. पदवी

सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय योगदानाबद्दल सन्मान होणार

yogesh by yogesh
January 2, 2025
in माझा महाराष्ट्र
A A
0
रत्नागिरीत ज्ञानदान चांगले : उदय सामंत

पुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठाच्या गव्हर्निंग बोर्ड आणि व्यवस्थापन मंडळाने डॉक्टर ऑफ लेटर्स – Honoris Causa (D.Ltt.) ही पदवी मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांना जाहीर केली आहे. नुकतेच तसे पत्र ना. उदय सामंत यांना प्राप्त झाले आहे. विद्यापीठाच्या ९ व्या दीक्षांत समारंभात ही पदवी ना. सामंत यांना प्रदान केली जाणार आहे. हा समारंभ लोहेगाव, पुणे, भारत मार्गे चर्होली बीके येथील अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शनिवारी, १ फेब्रुवारी, २०२५ रोजी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

उदय सामंत यांच्या नेतृत्वामुळे शिक्षण, रोजगार, ग्रामीण विकास, आणि कोकणातील प्रकल्पांना प्राधान्य मिळाले आहे. त्यांनी राज्याच्या राजकारणात मोठ्या ताकदीने आपली ओळख निर्माण केली असून लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या मतदारसंघातील जनतेचा विश्वास कायम ठेवला आहे. उदय सामंत यांचे सामाजिक योगदान त्यांच्या राजकीय कारकिर्दीइतकेच महत्त्वाचे आहे. त्यांनी लोकांच्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी, सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी, आणि लोकशाही प्रक्रियेत सामान्य नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध प्रकारे काम केले आहे. उदय सामंत यांचे सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानही महत्त्वपूर्ण आहे. ते समाजातील विविध संस्कृतींचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी सक्रिय आहेत. कोकणातील स्थानिक वारसा आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे.त्यांच्या या व अन्य सामाजिक सांस्कृतिक, राजकीय कामांची दखल घेऊन त्यांना ही पदवी प्रदान केली जाणार आहे.

Tags: उदय सामंतकिरण सामंतपदवीशिवसेना
ShareSend
Previous Post

रत्नकन्येचे ‘अब तक ५२’

Next Post

मराठीला अभिजात दर्जा अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्द

yogesh

yogesh

Related Posts

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती
माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

March 2, 2026
मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर
माझा महाराष्ट्र

मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

February 20, 2026
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझा महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 18, 2026
Next Post
मराठीला अभिजात दर्जा अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्द

मराठीला अभिजात दर्जा अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us