• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Wednesday, April 15, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

मराठीला अभिजात दर्जा अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्द

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या सततच्या प्रयत्नांना ११ वर्षानी यश

yogesh by yogesh
January 8, 2025
in माझा महाराष्ट्र
A A
0
मराठीला अभिजात दर्जा अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्द

नवी दिल्ली : प्रतिनिधी

मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाल्याबाबतचा अधिसूचना आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्त केली. यावेळी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये, तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ उपस्थित होते.

मंत्री उदय सामंत यांनी या ऐतिहासिक प्रसंगी आनंद व्यक्त करत म्हटलं, “११ वर्षांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवला होता. तेव्हा मी मराठी भाषेचा राज्यमंत्री होतो, आणि आज जीआर स्वीकारताना कॅबिनेट मंत्री आहे, हा मोठा योगायोग आहे. महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेला हा मान मिळाल्याचा अभिमान आहे.”हा निर्णय आणि जीआर मिळणे हे आगामी साहित्य संमेलनासाठी भाग्याचा क्षण आहे. माझ्या हातून हे ऐतिहासिक काम पूर्ण होतंय याचा मला अभिमान आहे,” असं मंत्री सामंत यांनी नमूद केलं.

या भेटीत मंत्री सामंत यांनी महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेला निधीची अधिक उपलब्धता करून देण्याची विनंती केली. तसेच पुण्यात होणाऱ्या आगामी विश्व मराठी संमेलनाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी येण्याचं मान्य केलं असल्याची माहिती दिली. सामंत यांनी नमूद केलं, “दिल्लीच्या साहित्य संमेलनाच्या पाठी आम्ही उभे राहणार असून, त्याला कोणताही राजकीय रंग दिला जाणार नाही.”

पुढील महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजात भाषेचा दर्जा हा महत्वाचा टप्पा ठरला आहे. मागील वर्षीपासून साहित्य संमेलनासाठी २ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाल्याची आठवणही मंत्री सामंत यांनी करून दिली.दिल्लीतील मराठी शाळा सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकार विशेष प्रयत्न करेल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत, मंत्री सामंत यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल धन्यवाद दिले.

Tags: अभिजात दर्जाउदय सामंतमराठीमराठी भाषामहाराष्ट्र शासन
ShareSend
Previous Post

उद्योगमंत्री उदय सामंत यांना डीवाय पाटील विद्यापीठाची डि. लिट. पदवी

Next Post

प्रादेशिक मनोरुग्णालय जिल्ह्यातून बाहेर जाणार नाही : ना. उदय सामंत

yogesh

yogesh

Related Posts

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती
माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

March 2, 2026
मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर
माझा महाराष्ट्र

मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

February 20, 2026
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझा महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 18, 2026
Next Post
प्रादेशिक मनोरुग्णालय जिल्ह्यातून बाहेर जाणार नाही : ना. उदय सामंत

प्रादेशिक मनोरुग्णालय जिल्ह्यातून बाहेर जाणार नाही : ना. उदय सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us