• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Sunday, April 12, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

yogesh by yogesh
March 7, 2026
in माझा महाराष्ट्र
A A
0
धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

नागपूर : प्रतिनिधी 

शहरात धार्मिक स्थळांवर विनापरवानगी लावण्यात आलेल्या भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. वारंवार आदेश देऊनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, येत्या सात दिवसांत सर्व अनधिकृत भोंगे काढण्याचे कठोर आदेश दिले आहेत.

शहरातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाबाबत न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दखल घेतली होती. न्या. अनिल पानसरे आणि न्या. निवेदिता मेहता यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी करताना खालील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले.

सार्वजनिक सूचना: शहरातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करून सात दिवसांची मुदत दिली जाईल. या काळात स्वतःहून भोंगे न काढल्यास प्रशासनाद्वारे ते जप्त केले जातील.

परवानगी असलेल्यांसाठी नियम: ज्यांनी रीतसर परवानगी घेतली आहे, त्यांचे ध्वनीक्षेपक जमिनीपासून १५ फूट उंचीवर आणि धार्मिक स्थळाच्या आतच असावेत.

मूलभूत अधिकारांचा समतोल: संविधानाच्या कलम १९ नुसार, नागरिकांना ‘बोलण्याचा’ अधिकार आहे, तसाच ‘न ऐकण्याचा’ आणि ‘शांत राहण्याचा’ देखील मूलभूत अधिकार आहे. या दोन्हीमध्ये समतोल राखणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

विवाह सोहळे आणि डीजेवरही निर्बंध : केवळ धार्मिक स्थळेच नव्हे, तर लग्नसमारंभातील गोंगाटावरही न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. लॉन्स किंवा सभागृहात होणाऱ्या विवाह सोहळ्यात डीजे (DJ) वापरण्यास परवानगी देऊ नये, असे निर्देश दिले आहेत. विनापरवानगी फटाके फोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.७५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या फटाक्यांच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘पेसो’च्या (PESO) मुख्य नियंत्रकांना प्रतिवादी करण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने हे पाऊल प्रायोगिक तत्त्वावर नागपूर शहरासाठी उचलले असून, येथील परिणामांचा आढावा घेऊन याचा विस्तार इतर क्षेत्रांत केला जाईल. पुढील सुनावणीत बांधकामे आणि वाहनांच्या आवाजावरही चर्चा होणार आहे.आता प्रशासनाला सात दिवसांच्या आत या आदेशाची अंमलबजावणी करावी लागणार असून, अनधिकृत भोंग्यांविरुद्ध मोठी मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे.

Tags: अनधिकृतनागपूर खंडपीठभोंगा
ShareSend
Previous Post

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

Next Post

‘अर्थ’संकल्प!

yogesh

yogesh

Related Posts

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती
माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

March 2, 2026
मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर
माझा महाराष्ट्र

मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

February 20, 2026
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझा महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 18, 2026
माझा महाराष्ट्र

जिल्हापरिषद निवडणुका लांबणीवर, इच्छुकांचे भवितव्य टांगणीवर!

January 9, 2026
Next Post
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!

'अर्थ'संकल्प!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us