• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

राजापूर तहसीलदारच्या आशिर्वादाने हातीवलेत अनधिकृत चिरेखाण राजरोस सुरु!

ज्येष्ठ नागरिक अनंत हळदवणेकर यांच्या आंबा बागायतीचे नुकसान, तहसीलदाराला सामान्य जनतेसाठी वेळच नाही!

yogesh by yogesh
January 11, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
राजापूर तहसीलदारच्या आशिर्वादाने हातीवलेत अनधिकृत चिरेखाण राजरोस सुरु!

रत्नागिरी : प्रतिनिधी

राजापूर तालुक्यातील हातीवले गावात सुरू असलेली शिवसेना शिंदे गटाचा गावपुढारी प्रसाद मोहरकर याची चिरेखाण आज कायद्याला धाब्यावर बसवून चालू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये खाण परवाना संपल्यानंतरही विनापरवाना उत्खनन सुरू असून तहसील प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. या बेकायदेशीर उत्खननाचा थेट फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसला आहे. ज्येष्ठ नागरिक अनंत हळदवणेकर यांच्या आंबा बागायतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, न्याय मिळावा म्हणून ते तहसीलदार कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने “सामान्य नागरिकांसाठी कायदा वेगळा आणि राजकीय पुढाऱ्यांसाठी वेगळा” असा संताप आता उघडपणे व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणात तहसीलदार गमरे यांना अनेकदा आमच्या प्रतिनिधीनी प्रतिक्रिया घेण्यासाठी कॉल केला असता, त्यांनी फोन उचलला नाही. ठराविक राजकीय व्यक्तींचे फोन उचलण्यास तत्परता दाखविणारे तहसीलदार सामान्य माणसासाठी कधी तत्पर होणार? हा सवाल उपस्थित होत आहे.

  • सप्टेंबर २०२५ ला परवाना संपला असताना होतेय विनापरवाना उत्खनन
  • चिरेखाणीमुळे अनंत हळदवणेकर यांच्या आंबा बागायतीचे नुकसान
  • अनंत हळदवणेकर या ज्येष्ठ नागरिकाचे तहसीलदार कार्यालयात हेलपाटे
  • तहसीलदारांचे खाणमालकाशी अर्थपूर्ण साटेलोटे असल्याचा संशय 
  • महसूल बुडवणाऱ्यांना तहसीलदाराचा आशीर्वाद
  • चिरेखाण बंद करण्याचे जिल्हाधिकारी यांचे तोंडी आदेश
  • जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला तहसीलदार यांच्याकडून वाटण्याच्या अक्षता

या संपूर्ण प्रकरणात तहसीलदार कार्यालयाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. खाणमालकाशी अर्थपूर्ण साटेलोटे असल्याचा आरोप नागरिक करत असून, शासनाचा महसूल खुलेआम बुडत असताना दोषींवर कारवाईऐवजी मौन बाळगले जात असल्याचे चित्र आहे. नियम मोडणाऱ्यांना तहसीलदारांचा आशीर्वाद मिळतोय का, असा सवाल आता राजापूरकर विचारू लागले आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी संबंधित चिरेखाण तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले असतानाही, त्या आदेशांना तहसीलदार स्तरावरच वाटण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कागदावर आणि खाण मात्र प्रत्यक्षात सुरू — हा प्रशासनातील अंतर्गत खेळ नेमका कोणासाठी सुरू आहे, यावर आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

एकीकडे शासन महसूल बुडतोय, दुसरीकडे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, आणि तिसरीकडे राजकीय वजनाच्या जोरावर नियम धाब्यावर बसवले जात आहेत — हीच का राजापूरची प्रशासन व्यवस्था? सामान्य नागरिक तहसीलदार कार्यालयात हेलपाटे मारतो, तर प्रभावशाली व्यक्तींसाठी नियम लवचिक होतात, हे चित्र लोकशाहीसाठी घातक असल्याचे स्पष्ट दिसते.

या प्रकरणात आता केवळ चौकशीच्या घोषणा नकोत, तर तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.विनापरवाना उत्खनन तत्काळ बंद करा,नुकसानग्रस्तांना भरपाई द्या,आदेश डावलणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा,आणि प्रशासन-खाणमालक साटेलोट्याची उच्चस्तरीय चौकशी करा हीच आज राजापूरकरांची ठाम भूमिका आहे.जर प्रशासनाने अजूनही कानाडोळा केला, तर हा विषय फक्त एका चिरेखाणीपुरता मर्यादित राहणार नाही, तर राजापूरातील सत्तेचा, पैशाचा आणि प्रशासनाच्या संगनमताचा उघडा पर्दाफाश होईल, हे मात्र निश्चित!

Tags: अनधिकृत चिरेखाणतहसीलदारराजापूर
ShareSend
Previous Post

कोकणाचे कोकणपण आपण सर्वांनी जपलं पाहिजे!

Next Post

जल प्रवाहांमध्ये सांडपाणी विसर्गाचा प्रश्न आवासून

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post
जल प्रवाहांमध्ये सांडपाणी विसर्गाचा प्रश्न आवासून

जल प्रवाहांमध्ये सांडपाणी विसर्गाचा प्रश्न आवासून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us