• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

जल प्रवाहांमध्ये सांडपाणी विसर्गाचा प्रश्न आवासून

दूषित जलस्रोतांबद्दल मिलिंद किर यांचा प्रशासनाला इशारा

yogesh by yogesh
January 13, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
जल प्रवाहांमध्ये सांडपाणी विसर्गाचा प्रश्न आवासून

रत्नागिरी : प्रतिनिधी

इंदोर, अहमदाबाद आणि दापोली येथे दूषित पाण्यामुळे उद्भवलेल्या गंभीर सार्वजनिक आरोग्य संकटांच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरीत अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी पावले उचलणं अत्यावशक आहे असे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचे म्हणणे आहे.दि. १३ जानेवारी रोजी श्री. मिलिंद कीर व सौ.हिमानी मिलिंद कीर यांनी रत्नागिरी नगर परिषद, जिल्हा प्रशासन, उपविभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) तसेच नगर परिषदेच्या अध्यक्षा यांना सविस्तर पत्र देऊन रत्नागिरी शहर व परिसरातील नैसर्गिक जलप्रवाहांमध्ये होत असलेल्या अप्रक्रिया सांडपाणी विसर्गाबाबत गंभीर इशारा दिला आहे.

कोकण नगर व साळवी स्टॉप परिसरातील सांडपाणी थेट शिरगाव ओढ्यात सोडले जात असल्याच्या तक्रारी आहेत. हा ओढा नाला नसून नैसर्गिक जलप्रवाह असून त्याचा थेट परिणाम भूजल, विहिरी, बोअरवेल, शेती व नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.दापोली तालुक्यातील आडे व उटंबर गावांत ३०–४० नागरिक जुलाबाच्या साथीने बाधित झाले. प्राथमिक अंदाजानुसार कारण दूषित पाणी. ही घटना “आज दुर्लक्ष, उद्या आपत्ती” याचा ठळक इशारा असल्याचे पत्रात नमूद आहे.

रत्नागिरी शहरातून ओसवाल नगर–फणशी–वरचा/खालचा फागर वाठार–सावंत नगर मार्गे जाणारे जलप्रवाह पुढे खारफुटी असलेल्या पारटवणे खाडीमध्ये मिळतात. सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट खाडीत व समुद्रात सोडले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.साळवी स्टॉप येथील बेकायदेशीर कचऱ्याचे ढीग वारंवार पेट घेत असून विषारी धूर शहराच्या वरच्या भागात पसरतो. यामुळे चिरायू हॉस्पिटलमधील रुग्णांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाल्याची बाब पत्रात नमूद आहे.उद्योग मंत्र्यांच्या कार्यालयासमोरील उघडी सांडपाणी वाहिनी संरक्षक अस्तराविना असल्याने भूजल झिरपण व विहिरी दूषित झाल्याच्या तक्रारी आहेत—ही स्थिती लाजिरवाणी व चिंताजनक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. MPCB चे सदस्य सचिव रत्नागिरीचे माजी जिल्हाधिकारी असल्याने प्राधान्याने तोडगा अपेक्षित होता; मात्र तसे होताना दिसत नाही, अशी ठाम नोंद करण्यात आली आहे.

  • सर्व जलप्रवाहांमध्ये सांडपाणी तात्काळ थांबवणे / STP उभारणी करणे
  • शिरगाव ओढा, ओसवाल–फणशी–सावंत नगर व पारटवणे खाडी येथे पाणी तपासणी व अहवाल सार्वजनिक करणे
  • MPCB कडून तात्काळ स्थळभेट व कारवाई करणे
  • साळवी स्टॉप कचरा हटवणे व आग प्रतिबंध आणणे
  • उघडी सांडपाणी लाईन बंद करून वैज्ञानिक पुनर्बांधणी करणे
  • खारफुटी क्षेत्रात कोणताही द्रवकचरा पूर्णपणे बंद करणे
  • भविष्यातील आजार/हानीसाठी जबाबदारी निश्चित करणे

नैसर्गिक जलप्रवाहात अप्रक्रिया सांडपाणी सोडणे हा Water (Prevention and Control of Pollution) Act, १९७४ अंतर्गत गुन्हा असून संविधानाच्या अनुच्छेद २१ चा भंग आहे. कारवाई न झाल्यास राष्ट्रीय हरित लवाद (NGT) कडे जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Tags: उद्योग मंत्रीजलनगर परिषदप्रदूषणमिलिंद किररत्नागिरी
ShareSend
Previous Post

राजापूर तहसीलदारच्या आशिर्वादाने हातीवलेत अनधिकृत चिरेखाण राजरोस सुरु!

Next Post

राजापूर अर्बन बँक : पावणेदोन कोटींचा अपहार, माजी शाखाधिकाऱ्यावर गुन्हा

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
राजापूर अर्बन बँक : पावणेदोन कोटींचा अपहार, माजी शाखाधिकाऱ्यावर गुन्हा

राजापूर अर्बन बँक : पावणेदोन कोटींचा अपहार, माजी शाखाधिकाऱ्यावर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us