रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील राजीवडा पुलाखालील परिसराचे नाव सध्या “बांगलादेश परिसर” किंवा “बांगलादेश झोपडपट्टी” या नावाने ओळखले जाते. हे नाव सामाजिक दृष्टिकोनातून निंदनीय असून त्या भागातील रहिवाशांच्या आत्मसन्मानावर घाला आहे, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. या भागाचे नाव बदलून “श्री देव काशी विश्वेश्वर मार्ग” ठेवावे, अशी मागणी मंगळवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित निवेदनाद्वारे रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली.
जिल्हाप्रमुख राहुल पंडित, बिपीन बंदरकर, बंड्या साळवी, सुदेश मयेकर, सुहेल मुकादम, विकास पाटील, संजय साळवी, विजय खेडेकर, संजय हळदणकर या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नगर परिषद मुख्याधिकारी गौरव गारवे यांची भेट घेत शहरातील विविध मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी राजीवडा पुलाखालील परिसराचे नाव सध्या “बांगलादेश परिसर” किंवा “बांगलादेश झोपडपट्टी” या नावाने ओळखले जाते. हे नाव सामाजिक दृष्टिकोनातून निंदनीय असून त्या भागातील रहिवाशांच्या आत्मसन्मानावर घाला आहे, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. या भागाचे नाव बदलून “श्री देव काशी विश्वेश्वर मार्ग” ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीवर मुख्याधिकारी काय पावले उचलतात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.




