• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

राजापूर शहराला २४ तास पाणी मिळण्यासाठी प्रयत्नशील : आ. भैय्या सामंत

कोदवली येथे नवीन धरण, वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत ८.१८ कोटीचा निधी उपलब्ध

yogesh by yogesh
April 28, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
राजापूर शहराला २४ तास पाणी मिळण्यासाठी प्रयत्नशील : आ. भैय्या सामंत

राजापूर : प्रतिनिधी 

भविष्यात राजापूर शहरवासीयांना २४ तास पाणीपुरवठा केला जाईल, यासाठी आपण विशेष लक्ष केंद्रीत केलेले आहे. शहरातील पाणीपुरवठा योजनांसह रस्ते व राजापूर शहराच्या सर्वांगिण विकासासाला चालना देताना या कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राजापूरचे आमदार किरण तथा भैय्या सामंत यांनी दिली. लांजा – राजापूर मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी राजकारण बाजुला सारून आपण सगळयांनी विकासाला गती देण्यासाठी एकसंघपणे काम केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

शहराला नैसर्गिक रित्या पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या खालील बाजूस सुरू असलेल्या नवीन पर्यायी धरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित कामाचा शुभारंभ शनिवारी राजापूरचे आमदार किरण सामंत व राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय ओगले यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला. या धरणाच्या उर्वरित बांधकामासह अन्य कामांसाठी शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत ८.१८ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या शुभारंभानंतर आ. सामंत यांनी धरणाच्या सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पहाणी केली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोदवली धरणस्थळी झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर राजापूर तहसीलदार विकास गंबरे, मुख्याधिकारी वैभव गारवे, राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, जमिर खलिफे, राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय ओगले, शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले, शशिकांत सुतार, प्रकाश कुवळेकर आदी उपस्थित होते. प्रारंभी आ. सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांच्या हस्ते नाम फलकाचे अनावरण करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना आ. सामंत यांनी आपण सगळयांनी विकासासाठी राजकिय मतभेद बाजुला सारून काम केले पाहिजे. या नवीन धरणाच्या निर्मितीने राजापूरचा पाणीप्रश्न निकाली निघणार आहे. राजापूरकरांना २४ तास पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आपले प्रयत्न असून शिळ जॅकवेलकडे समांतर पाईपालईन टाकण्याबरोबरच शहरातील जीर्ण झालेली पाणीपुरवठा वितरण व्यवस्थाही चांगली करून शहरवासीयांना पाणीपुरवठा करून पाणी टंचाईच्या संकटातुन कायमची मुक्त्तता केली जाईल, अशी ग्वाही आ. सामंत यांनी यावेळी दिली. या धरणाच्या कामासाठी प्रयत्न करणाऱ्या सगळयांचे आभार व्यक्त करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री उदय सामंत यांचेही आ. सामंत यांनी आभार मानले.

मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन कार्यालय अधिक्षक जितेंद्र जाधव यांनी केले. याप्रसंगी या धरण कामाचे ठेकेदार मे. विनोद कन्स्ट्रक्शनचे गदगू जाधव, विकास जाधव यांसह लांजाचे माजी नगराध्यक्ष राजू कुरूप, दिपक बेंद्रे, अरवींद लांजेकर, माजी उपनगराध्य विजय हिवाळकर आदींसह शहरातील नागरीक, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Tags: किरण सामंतपाणीराजापूरशहरसायबाचे धरण
ShareSend
Previous Post

शाळेचा संगणक पळवला,पोषण आहार विकला! लकी ड्रासाठी पावत्या छापून पैसे लाटले!

Next Post

गांजा प्रकरण : अत्ताउल्ला पटेल, फहाद पाटणकर, आयान मुल्ला पोलिसांच्या ताब्यात

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post
गांजा प्रकरण : अत्ताउल्ला पटेल, फहाद पाटणकर, आयान मुल्ला पोलिसांच्या ताब्यात

गांजा प्रकरण : अत्ताउल्ला पटेल, फहाद पाटणकर, आयान मुल्ला पोलिसांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us