• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

रत्नागिरीतील ६ व्यावसायिकांचे परवाने रद्द

yogesh by yogesh
March 30, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
रत्नागिरीतील ६ व्यावसायिकांचे परवाने रद्द

रत्नागिरी : प्रतिनिधी

अन्न व औषध प्रशासनाकडून आतापर्यंत केलेल्या तपासणीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ६ जणांचे अन्नपरवाने रद्द केले. तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थ प्रकरणी ४ एफआयआर दाखल केल्या असून, पावणेसात लाखांचा साठा जप्त केला आहे, अशी माहिती सहायक आयुक्त दीनानाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी झाली. या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह म्हणाले, पर्यटक, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हॉटेल, उपाहारगृह, मिठाई आस्थापना, खाद्यपदार्थ विक्री केंद्र यांची तपासणी मोहीम सुरू करावी. बस स्थानक परिसर, विविध ठिकाणी रस्त्यांलगत अन्नपदार्थ बनवून तेथेच विक्री करणाऱ्या केंद्रांचीही तपासणी करावी. दंडात्मक कारवाई वाढवावी. परिसरातील स्वच्छतेबाबत अन्ननोंदणी परवान्यांबाबत प्रशिक्षण शिबिरांचे आयोजनही करावे.

या बैठकीत शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली. घेतलेल्या ३०९ नमुन्यांपैकी ५ अप्रमाणित, अन्नपरवाने नोंदणीसाठी ५ हजार ४५८ अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी ४ हजार ५६७ निकाली अर्ज काढण्यात आले आहेत. त्यामधून १ कोटी ५ लाख १५ हजार ९०० रुपये शुल्क जमा झाले आहेत. अन्नपरवान्याबाबत ९० ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या असून, ६ जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे. नोंदणीबाबत ३९ ठिकाणी तपासण्या केल्या असून, १ निलंबन केले आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थप्रकरणी ४ एफआयआर दाखल केल्या असून, २ वाहने जप्त, ६ लाख ७७ हजार १६० रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत आदी उपस्थित होते.

Tags: अन्न व औषध प्रशासनअन्नपदार्थ परवानेरत्नागिरीव्यवसायव्यवसायिक
ShareSend
Previous Post

रत्नागिरीच्या तरुणांना समुद्री चाच्यांनी बनवले बंधक

Next Post

माझा शब्द, हेच वचन! उक्तीचा राजापूरवासीयांना प्रत्यय

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post
माझा शब्द, हेच वचन! उक्तीचा राजापूरवासीयांना प्रत्यय

माझा शब्द, हेच वचन! उक्तीचा राजापूरवासीयांना प्रत्यय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us