• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

स्वा. सावरकरांचे विचार चिरकाल टिकविण्याची जबाबदारी रत्नागिरीकरांची : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

yogesh by yogesh
February 28, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
स्वा. सावरकरांचे विचार चिरकाल टिकविण्याची जबाबदारी रत्नागिरीकरांची : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमधील शिरगावमध्ये राहिले त्याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील प्रत्येक माणसाने या निवासाला भेट द्यावी, हा जिल्ह्याचा अभिमान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार टिकविण्याची जबाबदारी रत्नागिरीकरांची आहे, असे उद्गार पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी काढले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनी बुधवारी येथील स्वातंत्र्यवीर वि. दा.सावरकर नाट्यगृहात दोन अंकी नाटक ‘सागरा प्राण तळमळला’ सादर झाले. याप्रसंगी स्वातंत्र्यवीर ज्या दामले कुटूंबियांच्या खोलीमध्ये राहिले त्या घराचे मालक शैला दामले यांचा सन्मान पालकमंत्री डॉ.सामंत यांनी केला. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, मराठी भाषा समिती सचिव तथा उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, मुख्याधिकारी तुषार बाबर, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, प्रसन्ना दामले, कोमसापचे गजानन पाटील, बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ.सामंत म्हणाले, तत्कालीन सरकारच्या भितीने स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोणी जागा देत नसताना, शिरगावमधील विष्णूपंत दामले यांनी त्यांना रहायला खोली दिली. दामले कुटूंबियांनी जागा देवून त्यांना साथ दिली, हा जिल्ह्याचा अभिमान आहे. शंभर वर्षापूर्वी स्वातंत्र्यवीरांचा विचार रत्नागिरीत होता. त्यांच्याच विचाराने रत्नागिरी पुढे जात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला सर्वाधिक शब्द दिले आहेत. आत्मार्पण दिनानिमित्त चिपळूण आणि रत्नागिरी येथे त्यांच्या जीवनावरील सागरा प्राण तळमळला हे दोन अंकी नाटक सादर करण्यात आले. स्वातंत्र्यवीरांचा हा विचार त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान नव्या पिढीला या नाटकामधून प्रेरणा देणारे ठरेल. त्यांचा विचार चिरकाल टिकविण्याची जबाबदारी रत्नागिरीकरांवर आहे, असेही ते म्हणाले. प्रसन्ना दामले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सादर झालेल्या दोन अंकी नाटकास उपस्थितांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला.

Tags: उदय सामंतनगर परिषदनाटकनाट्यगृहरत्नागिरीस्वा. सावरकर
ShareSend
Previous Post

सिंधुरत्न समृध्द योजना उमेदच्या हाऊस बोटीचे राई बंदरात लोकार्पण

Next Post

भारतच चॅम्पियन!

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post
भारतच चॅम्पियन!

भारतच चॅम्पियन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us