• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Friday, July 17, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

सिंधुरत्न समृध्द योजना उमेदच्या हाऊस बोटीचे राई बंदरात लोकार्पण

उद्योग उभारणीसाठी, रोजगार निर्मितीसाठी महिला भगिनींनी पुढाकार घ्यावा : ना. डॉ. उदय सामंत

yogesh by yogesh
February 20, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
सिंधुरत्न समृध्द योजना उमेदच्या हाऊस बोटीचे राई बंदरात लोकार्पण

रत्नागिरी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधून कर्ज घेतल्यास ३५ टक्के सबसिडी दिली जाते. महिला भगिनींनी कर्ज घेऊन उद्योग उभे करावेत. तो वाढवून रोजगार निर्मिती करावी, त्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केला.जिल्हा परिषद रत्नागिरी सिंधुरत्न समृध्द योजना पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी उमेद अंतर्गत महिला प्रभाग संघांना देण्यात येणाऱ्या हाऊस बोटचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते राई बंदरात गुरुवारी झाले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, डीआरडीएचे प्रकल्प संचालक विजय जाधव, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, बिपीन बंदरकर, सरपंच श्रृती शितप आदी उपस्थित होते.

फित कापून हाऊस बोटीचे लोकार्पण केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून देशात पहिल्यांदा हाऊस बोट इथे आहे. जिल्ह्यामध्ये अशा आणखी ४ हाऊस बोटी येणार आहेत. हा प्रकल्प अतिशय चांगला आहे. निसर्गरम्य वातावरणात तो निश्चितपणे देशात आदर्शवत ठरेल. हा रत्नागिरी पॅटर्न राबविण्यासाठी सर्वजण पुढाकार घेतील. काश्मिर आणि केरळनंतर रत्नागिरीतही हाऊस बोटी आहेत, असे अभिमानाने सांगता येईल. महिला प्रभाग संघांना देण्यात आलेली टुरिस्ट वाहनेही सातत्याने आरक्षित असतात. आणखी ६ वाहने द्यायची आहेत. ही वाहने चालविणारे चालक व वाहक दोघीही महिला असाव्यात. त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी माझी राहील.

सध्याच्या युगात महिला पायलट सर्वात उत्तम विमाने चालवत आहेत. त्याप्रमाणे हाऊस बोटीची कॅप्टन देखील महिला असावी. जिल्ह्यामध्ये सुरु केलेले उपक्रम पुढे चालू ठेवणे, ही देखील आपली जबाबदारी आहे. महिला भगिनींनी उद्योगधंद्यांकडे वळले पाहिजे, त्यासाठी मानसिकता असावी. हाऊस बोटीच्या प्रकल्पाजवळ खाऊ गल्ली तयार करा. त्यासाठी पुढाकार घ्यावा. न्याहरी निवास योजना चळवळ म्हणून राबविण्यासाठी उमेदने पुढाकार घ्यावा. त्यामध्ये महिलांनी चांगले काम करावे, असेही पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाला एकता महिला प्रभाग संघांच्या स्वरा देसाईंसह विविध बचतगटांचा महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Tags: उदय सामंतकिरण सामंतजिल्हाधिकारीपर्यटनरत्नागिरीहाऊस बोट
ShareSend
Previous Post

रत्नागिरी जिल्हा सीसीटीव्हीच्या नजरेत आणणार : ना. डॉ. उदय सामंत

Next Post

स्वा. सावरकरांचे विचार चिरकाल टिकविण्याची जबाबदारी रत्नागिरीकरांची : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. भैय्या सामंत इफेक्ट : लांजा शहराच्या विकासासाठी २० कोटी मंजूर

July 14, 2026
‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!
माझी रत्नागिरी

‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!

July 6, 2026
‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार
माझी रत्नागिरी

‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार

July 4, 2026
चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन
माझी रत्नागिरी

चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन

July 4, 2026
Next Post
स्वा. सावरकरांचे विचार चिरकाल टिकविण्याची जबाबदारी रत्नागिरीकरांची : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

स्वा. सावरकरांचे विचार चिरकाल टिकविण्याची जबाबदारी रत्नागिरीकरांची : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us