• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा सीसीटीव्हीच्या नजरेत आणणार : ना. डॉ. उदय सामंत

पोलीस विभागाला प्राप्त १० स्कॉर्पिओ, १४ बाईक, व्हिजीटर मॅनेजमेंट सिस्टीमचे लोकार्पण

yogesh by yogesh
February 20, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
रत्नागिरी जिल्हा सीसीटीव्हीच्या नजरेत आणणार : ना. डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : प्रतिनिधी

मोबाईल हे आधुनिक शस्त्र आहे, त्या माध्यमातून सायबर गुन्हे होत आहेत. आधुनिक यंत्रणेचा उपयोग सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे. रत्नागिरी जिल्हा संपूर्ण सीसीटीव्हीच्या नजरेत आणला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.पोलीस विभागाला प्राप्त १० स्कॉर्पिओ, १४ सी प्रहरी (ई बाईक) तसेच व्हिजीटर मॅनेजमेंट सिस्टीमचे लोकार्पण येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात पालकमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी झाले. या कार्यक्रमाला आमदार भास्कर जाधव, आमदार किरण सामंत उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, डीपीसीमधून पोलीस विभागाला लागणारी वाहने रत्नागिरीत सर्वात जास्त डीपीसीमधून आहेत. पोलीसांनी सुखकर आयुष्य जगले पाहिजे. त्यांच्यावरील ताण कमी झाला पाहिजे. त्यांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत, त्यासाठी 178 कोटी मधून पोलीस निवास इमारत उभी राहत आहे. मुख्यमंत्री महोदयांचा 7 कलमी कार्यक्रम केवळ 100 दिवसांचा आराखडा न राहता, 365 दिवस कार्यक्रम चालला पाहिजे. समाजाला पोलीसांची आदरयुक्त भीती असली पाहिजे आणि पोलीसांनाही जनतेविषयी प्रेम असले पाहिजे.

मोबाईल हे आधुनिक शस्त्र बनले आहे. सायबर क्राईम होत आहेत. आक्षेपार्ह पोस्टवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीसांनी पुढाकार घ्यावा. देशात धर्मा-धर्मात भांडणे लावणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखला करावा. जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र सीसीटीव्ही लावले जातील. संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या नजरेत आणण्यावर भर राहील, असेही पालकमंत्री म्हणाले.

आमदार श्री. जाधव म्हणाले, नागरिकांना त्यांना असणाऱ्या हक्कांची जाणीव झाली आहे. सायबर गुन्ह्यांची वाढ झाली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्ह्याचा शास्त्रशुध्दपणे उकल करावा लागतो. पोलीसांनी गुन्हा नोंद केला नाही, तर तो ऑनलाईन दाखल केला जातो. सर्वसामान्य जनतेसाठी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकांमध्ये जाताना, त्यांच्या वाहनाच्या काचा खाली असल्या पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली.

स्वागत प्रस्ताविकेत पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले, पोलीस विभागामार्फत प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. ठाण्यांमध्ये येणारा नागरिक त्याचे काम झाल्यावर व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीमध्ये पोलीसांविषयीचा अभिप्राय नोंदवू शकेल. पोलीस विभागांमधील जिल्ह्याची असणारी शिस्तीची परंपरा यापुढेही चालू ठेवली जाईल.अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: उदय सामंतकिरण सामंतपोलिसभास्कर जाधवरत्नागिरीरत्नागिरी पोलीस
ShareSend
Previous Post

विद्यार्थ्यांसाठी छावा चित्रपट ५०% सवलतीने प्रदर्शित करावा : आ. किरण सामंत

Next Post

सिंधुरत्न समृध्द योजना उमेदच्या हाऊस बोटीचे राई बंदरात लोकार्पण

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post
सिंधुरत्न समृध्द योजना उमेदच्या हाऊस बोटीचे राई बंदरात लोकार्पण

सिंधुरत्न समृध्द योजना उमेदच्या हाऊस बोटीचे राई बंदरात लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us