रत्नागिरी : प्रतिनिधी
येथील मरुधर विष्णू समाज सेवा समितीच्यावतीने आयोजित नवरात्री गरबा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सर्व समाज बांधवांनी सहभागी होऊन आई भगवतीची पूजा केली. तसेच समाज बांधवांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला आहे.
या धार्मिक कार्यक्रमात सर्व समाज बांधव पूर्ण समर्पणाने सहभागी झाले होते. माता भगवतीच्या कृपेने यंदाच्या नवरात्री गरबा महोत्सवाची सांगता भक्तिभावाने झाली.ज्यांनी हा उत्सव शांततेत आणि भव्यपणे पार पाडण्यास मदत केली, त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमात समाजातील सर्व सदस्यांचा जोश आणि उत्साह पाहण्यासारखा होता. यावेळी राजस्थानी परंपरेला अनुसरून अखंड नवरात्रीचा उपवास करणाऱ्या स्त्री-पुरुषांचे राजस्थानी पगडी घालून स्वागत करण्यात आले व महिलांचे चुनरी परिधान करून स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यात आले.




