• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, September 1, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

रत्नागिरीत ज्ञानदान चांगले : उदय सामंत

कोकण विभागीय मंडळाच्या प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

yogesh by yogesh
October 14, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0
रत्नागिरीत ज्ञानदान चांगले : उदय सामंत

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरीत सर्वात चांगले ज्ञानदान होत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. कोकण बोर्ड सतत राज्यात पहिले राहिले आहे. ते एक नंबरलाच राहिले पाहिजे, यासाठी सांघिकपणाने काम करु, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोकण विभागीय मंडळाच्या नियोजित प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. सामंत यांनी केले. याप्रसंगी शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार तथा राज्य मंडळाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य विक्रम काळे, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक, विभागीय सचिव सुभाष चौगुले, कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष महेश चोथे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी एम कासार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, २०१२ मधील कोकण बोर्डाची मूहुर्तमेढ रोवण्यात आली आहे. तेव्हापासून मेहनतीने आणि ताकदीने राज्यात पहिल्या २ क्रमांकात कोकण बोर्ड राहिले आहे. त्यासाठी शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मनापासून धन्यवाद देतो. २४ कोटी रुपयांमधून राज्यातील सर्वात देखणी इमारत वर्ष दीडवर्षात उभी राहील. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देऊन पालकमंत्री म्हणाले, ज्यांनी ज्यांनी मराठी शिकविली, ज्यांनी ज्यांनी मराठी सुदृढ केली, त्या शिक्षकांना आणि साहित्यिकांना याचे श्रेय जाते. नव्या प्रशासकीय इमारतीमधून दरवर्षी ५० हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे ही इमारत नसून, मंदिर आहे. कोकण बोर्ड नेहमीच महाराष्ट्रात पहिल्या नंबरवर राहिले पाहिजे. यासाठी सांघिकपणाने काम करु या, असे ही ते म्हणाले.

शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, कोकण बोर्डाची कामगिरी अतिशय चांगली राहिली आहे. त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या कारकीर्दीत कोकण बोर्डाची स्थापना झाली आहे. आमदार विक्रम काळे, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे या सर्वांचे कोकणावर विशेष लक्ष असते. त्यामुळे आमचे विद्यार्थी बोर्डाला नेहमीच राज्यात अव्वल ठेवतात. त्याबद्दल विद्यार्थी, पालकांचे अभिनंदन करतो. आमदार श्री. म्हात्रे आणि आमदार श्री. काळे यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. राज्यमंडळाचे अध्यक्ष श्री. गोसावी यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला शिक्षक, अधिकारी, पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: उदय सामंतकोकण बोर्डदीपक केसरकर
ShareSend
Previous Post

मरुधर विष्णू समाज सेवा समितीचा नवरात्री उत्सव जल्लोषात

Next Post

महायुती विरोधात बोलाल तर कारवाई

yogesh

yogesh

Related Posts

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’
माझी रत्नागिरी

ना. योगेश कदमांकडून महसूलच्या अधिकाऱ्यांना ‘डोस’

August 21, 2026
आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!
माझी रत्नागिरी

आंबा घाट सुरक्षित वाहतुकीसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांसोबत आ. किरण सामंत मैदानात!

August 18, 2026
रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!
माझी रत्नागिरी

रत्नागिरीत अवतरला देशभक्तीचा तिरंगी महासागर!

August 14, 2026
जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण
माझी रत्नागिरी

जागृत मोटर्सविरोधात कामगारांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

August 10, 2026
Next Post
महायुती विरोधात बोलाल तर कारवाई

महायुती विरोधात बोलाल तर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us