• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

महायुती विरोधात बोलाल तर कारवाई

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा वाचाळवीर नेत्यांना इशारा

yogesh by yogesh
October 16, 2024
in माझा महाराष्ट्र
A A
0
महायुती विरोधात बोलाल तर कारवाई

नागपूर : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील वाचाळवीरांविरोधात भारतीय जनता पक्षाने कठोर भूमिका घेतली आहे. रामटेकमध्ये माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांना निलंबित केल्यानंतर पक्षात खळबळ उडाली असताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी इतर ठिकाणीदेखील आवश्यकता पडल्यास असेच पाऊल उचलण्यात येईल, अशी भूमिका मांडली आहे. भाजपचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

मागील काही काळापासून पक्षातील वाचाळवीरांमुळे महायुतीत दरी निर्माण होते की काय असे चित्र निर्माण झाले होते. राज्यातील विविध भागांमध्ये अशा वाचाळ पदाधिकाऱ्यांमुळे पक्ष अडचणीत येत होता. मागील महिन्यातच बावनकुळे यांनी अशा नेत्यांना इशारा दिला होता. मात्र तरीदेखील काही जणांनी तशीच भूमिका ठेवली आहे. पक्षाच्या धोरणांविरोधात भूमिका घेतल्यामुळे रेड्डी यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. मात्र केवळ रेड्डींवरच कारवाई थांबणार नसल्याचे संकेत प्रदेशाध्यक्षांनी दिले आहेत. पक्षाने काही कठोर निर्णय घेतले आहेत. पक्षविरोधी कारवाया करणे, पक्षाच्या अंतर्गत विषयाला सार्वजनिकपणे बोलत पक्षशिस्तीचे उल्लंघन करणे असे प्रकार काही जणांकडून करण्यात आले. पुढील काळात महायुतीविरोधात जो नेता किंवा कार्यकर्ता जाहीर बोलेल किंवा बंड पुकारेल त्याविरोधात कारवाई होईल. पक्षाच्या मंचावर निश्चित प्रत्येकाला नाराजी मांडता येईल, मात्र सार्वजनिकपणे पक्षविरोधी भूमिका मान्य करण्यात येणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यावर विरोधी पक्षांकडून सरड्यासारखा रंग बदलण्यात आला आहे. ते एकाच टप्प्यात निवडणूक का आहे असा सवाल करत आहेत. मात्र लोकसभेत सात टप्प्यात निवडणूक झाली तेव्हादेखील त्यांनी टीका केली होती व आता महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होत असताना ते परत निवडणूक आयोगाविरोधात बोलत आहेत. त्यांना निवडणूकीत पराभव दिसतो आहे. त्यामुळे ते असा प्रकार करत आहेत, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले.

Tags: कारवाईभाजपमहायुतीशिवसेना
ShareSend
Previous Post

रत्नागिरीत ज्ञानदान चांगले : उदय सामंत

Next Post

दिवाळी येताच खासगी बस प्रवास दरांमध्ये प्रचंड वाढ

yogesh

yogesh

Related Posts

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती
माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

March 2, 2026
मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर
माझा महाराष्ट्र

मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

February 20, 2026
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझा महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 18, 2026
Next Post
दिवाळी येताच खासगी बस प्रवास दरांमध्ये प्रचंड वाढ

दिवाळी येताच खासगी बस प्रवास दरांमध्ये प्रचंड वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us