• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

सार्वजनिक बांधकाम विभागाला ‘मनसे दणका’

रत्नागिरीत मनसेचे ठिय्या, जनतेच्या प्रश्नावर आक्रमक पवित्रा

yogesh by yogesh
August 16, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0
सार्वजनिक बांधकाम विभागाला ‘मनसे दणका’

रत्नागिरी : प्रतिनिधी

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराची अनेक नमुने रत्नागिरीकरांसमोर येत आहेत. याबाबत अनेकांनी माहिती अधिकारात अर्ज दिले असून सुद्धा त्यावरती योग्य ते कागदपत्र किंवा परिपूर्ण माहिती देण्यासाठी बांधकाम विभाग टाळाटाळ करत आहे. ही सगळी गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पतीने सार्वजनिक बांधकाम रत्नागिरीचे अधीक्षक अभियंता छाया नाईक यांना जाब विचारण्यात आला. त्यांनी योग्य उत्तरं न दिल्यामुळे आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी घोषणाबाजी करत तिथे या आंदोलन केले.

यावेळी पुढील ४ दिवसात संबंधित योग्य कागदपत्र व माहिती दिली जाईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने देण्यात आले. याप्रसंगी मनसेचे संपर्क अध्यक्ष द. रत्नागिरी जिल्हा मनिष पाथरे यांच्या तालुका अध्यक्ष रूपेश जाधव, रस्ते आस्थापना जिल्हा अध्यक्ष अजिंक्य केसरकर, मनविसे जिल्हा अध्यक्ष गुरु प्रसाद चव्हाण, माजी तालुका अध्यक्ष अनिरुद्ध खामकर, उपतालुका अध्यक्ष राजू पाचकुडे, अक्षय चव्हाण, अनंत शिंदे, सुनील पारकर, साहिल वीर, सौरभ गायकवाड, सोम पिलणकर, माजी शहर अध्यक्ष सतीश राणे, ऋषिकेश रसाळ, शक्ती मयेकर, अमोल साळवी,अनिल पारकर, शिल्पाताई कुंभार, तसेच अन्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष आहेत कुठे? 

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मनसेची ताकद वाढत असताना अशी जनतेच्या प्रश्नावर आंदोलने होत असताना जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर फारसे कुठे दिसत नाहीत. आंदोलनामध्ये त्यांची अनुपस्थिती ही सगळ्यांनाच खटकणारी आहे. सौंदळकर यांनी अलीकडे आपली आंदोलनाची तलवार म्यान केल्याचे दिसत आहे. पूर्वी विविध विषयांवर ती आंदोलन करू असे म्हणणारे सौंदळकर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आंदोलनात कसे काय दिसले नाहीत? रत्नागिरी शहरातील महत्त्वाच्या विभागांमध्ये अनेक प्रश्न जनतेला सतावत असतात. त्यासाठी कोणीतरी आवाज उठवण्याची गरज असते. मनसेकडे त्या दृष्टीने जनता पाहत आहे. मात्र जिल्हाध्यक्ष याबाबत निरुत्साही असतील तर जनतेने कुणाकडे बघावे हा प्रश्न आहे.

यावेळी मनीष पाथरे यांनी आक्रमक भूमिका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाची लक्तरे काढली. रत्नागिरी जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामच्या कामांमध्ये असलेली अनियमितता आणि ठराविक लोकांच्या दबावात चाललेले काम यावर कडक शब्दात नाराजी व्यक्त केली. आगामी काळात हे असले धंदे खपवून घेतले जाणार नाहीत आणि चुकीचे कामे केल्यास मनसे स्टाईल दणका देण्यात येईल असा इशारा मनीष पाथरे यांनी दिला. त्यावेळी अजिंक्य केसरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गैर कारभाराचा पाढाच वाचला. आक्रमक झालेले मनसैनिक यावेळी मागण्या मान्य करण्यासाठी तटून बसले. मात्र योग्य आश्वासन मिळायला उशीर झाल्याने मनसैनिकांनी तिथेच ठिय्या मांडला. यावेळी मला आक्रमक मनसैनिकांचा पवित्रा पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नरमले आणि त्यांनी चार दिवसात सगळी आवश्यक आणि योग्य ती कागदपत्रे आपल्याला देण्यात येतील असे आश्वासन दिले. त्यानंतर हे उस्फूर्तपणे झालेले आंदोलन स्थगित करण्यात आले.

Tags: आंदोलनबांधकाम विभागमनसे
ShareSend
Previous Post

मनसेचा रत्नागिरी रस्ते आस्थापना विभाग जोमात

Next Post

लाडकी बहिण योजना राबविताना भोंगळ कारभार

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post

लाडकी बहिण योजना राबविताना भोंगळ कारभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us