• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

लाडकी बहिण योजना राबविताना भोंगळ कारभार

दिलेल्या खात्या व्यतिरिक्त दुसऱ्याच खात्यात रक्कम जमा, बहिणींसमोर अनंत अडचणी

yogesh by yogesh
August 17, 2024
in माझा महाराष्ट्र
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी 

महाराष्ट्र शासनाच्या लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र गेले दोन महिने मोठ्या खटपटी करून कागदपत्रांची जमवाजमव करीत प्रस्ताव सादर केलेल्या अनेक महिलांचे दोन हप्त्यांचे ३००० रुपये हे त्यांनी दिलेल्या बँक खात्याव्यतिरिक्त गृहकर्ज खात्यात जमा झाले असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. भावाने नेमलेल्या यंत्रणेचा हा भोंगळ कारभार बहिणींना त्रासदायक ठरत आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील हजारो महिलांनी अंगणवाडी कर्मचारी यांच्यामार्फत ऑफलाईन तर काही महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. पात्र महिलांना राज्य शासनाने सांगितल्यानुसार जुलै ऑगस्ट २०२४ असे तीन हजार रुपये इतके दोन हप्त्यांचे पैसे दिनांक १४ ऑगस्टपासून खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांचे पैसे त्यांनी दिलेल्या खात्यावर जमा झाले. मात्र, केवायसी अपडेट करायची राहिलेली खाती तसेच सद्यस्थितीत आधार अपडेट दाखवत नसलेली बँक खाती अशा अडचणी असलेल्या महिलांना त्यांनी त्यांचा आधार क्रमांक बँक खात्याशी तत्काळ जोडण्याचे मेसेज पाठवण्यात आले आहेत. हा मेसेज आल्यानंतर महिलांनी आपापल्या बँकांमध्ये आधार क्रमांक खात्याला संलग्न करण्यासाठी गर्दी केली आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसे प्राप्त होण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक महिलांचे पैसे अशा अकाउंटला जमा झाले आहेत की, त्यांना ते वापरत नसल्याने, देवघेव करत नसल्याने, खाते माहित देखील नाही. आधार अपडेट असलेल्या बँक खात्यावरच हे पैसे पाठवले जात असल्यामुळे अनेक महिलांच्या बाबतीत असे झाले आहे की, त्यांनी अर्ज दिलेली बँक एक होती तर पैसे आलेली बँक नेमकी कुठली हे त्यांना शोधावे लागत आहे. यामध्ये असे निदर्शनास आले आहे की, काही महिलांचे पैसे हे त्यांच्या पोस्टाच्या खात्यात देखील जमा झाले आहेत तर काही महिला अशा सांगत आहेत की, मी दिला होता स्टेट बँकेचा नंबर पण पैसे आलेत बँक ऑफ बडोदामध्ये!

लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर महिलांना प्रत्यक्षात पैसे येऊ लागल्यामुळे त्यांचा उत्साह वाढला असतानाच नको असलेल्या खात्यावर पैसे जमा होऊ लागल्यामुळे त्यांना आता नव्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये काही महिलांची बँक खाती अशी आहेत की, त्यांनी त्यांच्या छोट्या-मोठ्या कर्जाचा हप्ता ऑटो डेबिट पडण्यासाठी जो खाते क्रमांक दिला आहे त्यावर पैसे जमा झाल्यामुळे काही गरजवंत महिला त्यांचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे काढू शकत नाहीत. त्याचे कारण हे आहे की, ज्यांचा कर्जाचा ईएमआय कापून जाणार आहे आणि तो जर ड्यू झाला आहे तर बँक खात्यावर तीन हजार रुपये बँक जमा होऊन सुद्धा ते काढता येऊ शकत नाही. यामध्ये काही महिला अशाही आढळून आल्या की, त्यांच्या कर्जाचा हप्ता सहा ते सात हजार रुपये आहे तो ड्यू दाखवत असल्यामुळे आलेल्या तीन हजार रुपयांमध्ये तीन ते चार हजार रुपये अजून भरल्यानंतर हप्ता कापून जाऊ शकणार आहे. त्यामुळे ज्या उत्साहाने महिलांनी जे बँक खाते क्रमांक दिले होते लाभाची रक्कम जमा न झालेल्या महिलांमध्ये नाराजी जाणवत आहे.

मागील एक दोन दिवसांपासून महिला बँकांमध्ये गर्दी करत आहेत. अनेकांना असे वाटत आहे की महिला पैसे काढण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र प्रत्यक्षात यातील अनेक महिला या योजनेचे पैसे न आलेल्या व आधार अपडेट करण्यासाठी बँकांमध्ये गर्दी करून असलेल्या पाहायला मिळाल्या. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर महिला लाभार्थी बँकांमध्ये पोहोचल्याने बँक वाले अशा महिलांचे आधार क्रमांक तत्काळ अपडेट करण्याऐवजी त्यांच्याकडून तसे फॉर्म भरून घेत महिलांना घरी पाठवत आहेत. त्यामुळे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला की नाही, हे पाहण्यासाठी महिलांना पुन्हा बँकेचे उंबरठे झिजजवावे लागणार आहेत. कारण बँक खात्याला आधार क्रमांक संलग्न असल्याशिवाय योजनेचे पैसे खात्यावर येत आहेत.

Tags: भोंगळ कारभारमाझी लाडकी बहिण योजना
ShareSend
Previous Post

सार्वजनिक बांधकाम विभागाला ‘मनसे दणका’

Next Post

अखेर बॅनरवर खासदार राणेंचा फोटो लावला!

yogesh

yogesh

Related Posts

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती
माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

March 2, 2026
मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर
माझा महाराष्ट्र

मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

February 20, 2026
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझा महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 18, 2026
Next Post
मुंबई – गोवा महामार्गावरील निवळी येथील उड्डाणपूल रद्द होणार!

अखेर बॅनरवर खासदार राणेंचा फोटो लावला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us