• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

रत्नागिरीत हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे लव्ह जिहादविरोधी  आंदोलन

yogesh by yogesh
August 6, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

नवी मुंबईतील उरण येथील २२ वर्षीय कु. यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमा फासला जावा, अशा प्रकारे हत्या करण्यात आली. या विरोधात केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. ही काही पहिली घटना नव्हे. खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून अनेक मुलींना लक्ष करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतर’ यांनी गंभीर रूप धारण केले आहे. यामुळे महिला आणि मुली यांचे जीवन असुरक्षित झाले आहे. अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ विरोधी कायदा करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने जयस्तंभ येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाला १०० हून अधिक हिंदुत्त्वनिष्ठ उपस्थित होते.

यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केली. ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे हाताळण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या धरतीवर ‘अँटी रोमिओ स्क्वाड’सारखी पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी. मुसलमान युवक आणि हिंदू युवती यांच्या प्रेम प्रकरणांच्या तक्रारी ‘लव्ह जिहाद’ म्हणून नोंदवल्या जाव्यात. ‘लव्ह जिहाद’साठी विदेशातून होणारा अर्थ पुरवठा, युवतींची तस्करी आणि आतंकवादी कारवायांसाठी होणारा वापर यांची ही शासनाने चौकशी करावी अन् दोषींवर कठोर कारवाई करावी. ‘लव्ह जिहाद’शी संबंधित कट्टरतावादी संघटना आणि जिहादी नेते यांच्यावर कठोर कारवाई करावी. ‘लव्ह जिहाद’सारख्या घटना रोखण्यासाठी शाळा महाविद्यालयांमधून मुली-मुलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात यावे, तसेच त्यांच्यासाठी प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करावे, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे करत आहोत, असे मनोगत संजय जोशी, यांनी व्यक्त केले.

यावेळी श्री महापुरुष देवस्थान, कोकण नगर, रत्नागिरीचे श्री. प्रसन्न बिर्जे, श्री मरुधर विष्णू समाजाचे श्री. विराम चौधरी, श्री. जितेंद्रसिंह, श्री. भोलाराम चौधरी, इस्कॉनचे श्री. विजय भाटकर, गणपतीपुळेचे माजी सरपंच श्री. महेश केदार, खोत श्री. विजय भिडे, माजी नगरसेवक श्री. महेंद्र साळवी, कुवारबाव व्यापारी संघाचे सचिव श्री. प्रभाकर खानविलकर, रा.स्व. संघाचे श्री. प्रदीप दांडेकर, शिवचरित्र कथाकार श्री. अरविंद बारस्कर, गोप्रेमी अमितराज खटावकर, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, कुवारबावचे श्री. मंगेश राऊत, श्री. सुशील ऐवळे, हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सागर कदम, श्री. गौरव पावसकर, राजस्थान क्षत्रिय संघ रत्नागिरीचे श्री. रविंद्रसिंह राणावत, गो सेवा संघाचे सचिव श्री. सुशील कदम, श्री चंडिका मंदिर, गणपतीपुळेचे सचिव श्री. विनोद माने, धर्मजागरण मंचचे श्री. विजय यादव, श्री. चंद्रकांत राऊळ, श्री. भाई दळी, निवळी येथील श्री. संतोष शिंदे, पाचल येथील श्री. शैलेश जंगम, खेडशी येथील श्री. जीवन जाधव, काजरघाटी येथील श्री. दुर्गेश पिलणकर, मनसेचे श्री. तेजस साळवी, चिंचखरी येथील श्री. संतोष बोरकर, गड दुर्गप्रेमी श्री. विकी मोंडकर, श्री हनुमान मंदिर, मजगाव रोडचे श्री. किशोर भुते, श्री. ओमकार गर्दे, गोळप सडा येथील श्री. शशांक कोलथरकर, जुवे येथील अनिमेष कीर, श्री माधव ताटके, भाजपचे श्री. दादा ढेकणे, श्री. भाई राऊत, कु. संस्कृती शेडबाळे, सौ. जान्हवी पोसरेकर, मीरा लिंगायत, सनातन संस्थेच्या सौ. शुभांगी मुळ्ये, सौ. जान्हवी गुळेकर, श्री. गोविंद भारद्वाज, हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. विनोद गादीकर, विनय पानवळकर आदी उपस्थित होते. यावेळी सौ.अक्षता म्हात्रे,कु.यशश्री शिंदे,कु.अरविंद वैश्य यांना श्रद्धांजली वहाण्यात आली.

Tags: सकल हिंदू समाजसनातनहिंदूहिंदू जनजागृती समिती
ShareSend
Previous Post

अनधिकृत मदरशाविरोधात धोपेश्वर पन्हळे ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

Next Post

देवस्थानच्या इनामी जमिनी कब्जेदारांना देण्याला विरोध

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post

देवस्थानच्या इनामी जमिनी कब्जेदारांना देण्याला विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us