• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

देवस्थानच्या इनामी जमिनी कब्जेदारांना देण्याला विरोध

yogesh by yogesh
August 7, 2024
in माझा महाराष्ट्र
A A
0

सरकारने निर्णयाचा फेरविचार करण्याची महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून मागणी

मुंबई : प्रतिनिधी

मंदिराचे आर्थिक व्यवस्थापन, दिवाबत्ती आणि वार्षिक उत्सव आदी सर्व व्यवस्थित पार पडावे या उदात्त हेतुने राजे-महाराजे यांसह भाविकांनी स्वत:ची जमीन मंदिरांना दान दिली. या ‘वर्ग २’ मध्ये असलेल्या जमीनी कोणालाही विकता येत नाही, असे असतांना मराठवाड्यातील या ‘वर्ग २’ च्या इनामी जमीनी ‘वर्ग १’ मध्ये रूपांतरित करून भोगवाटदार अथवा कब्जेदार यांच्या ताब्यात कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्याचा निर्णय घेणार असल्याचे शासनाने प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना सांगितले आहे. सरकारचा हा प्रस्तावित निर्णय मंदिरांना कायमस्वरूपी आर्थिकदृष्ट्या दुर्बल करणारा असल्याने ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चा या निर्णयाला तीव्र विरोध आहे. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून असा कोणताही निर्णय सरकारने घेऊ नये, असे आवाहन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिला आहे.

एक कोटी रुपयांची बाजारमूल्य असलेल्या जमीनीची केवळ ५ लाख रुपये भोगवाटदार वा कब्जेदाराने जमा करायची. त्यातील केवळ २ लाख रुपये रक्कम एकदाच मंदिराला मिळणार, हे अत्यंत अन्यायकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘मंदिरांची भूमी पुजारी अथवा भोगवाटदार यांच्या नावाने करता येत नाही’, तसेच ‘मंदिरांच्या जमीनीवर अन्य कोणाचा अधिकार नाही’, असे ऐतिहासिक निर्णय दिलेले आहेत. ‘मंदिराची संपत्ती पूर्णपणे संरक्षित ठेवणे हे सरकारचे दायित्व असल्याचा’ महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २००७ मध्ये दिला आहे. त्यामुळे शासनाचा सदर निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लंघन करणारा ठरेल.

देशात सर्वांना न्याय समान असतांना आजही देशातील केवळ मंदिरांचेच सरकारीकरण केले जाते, मंदिरांचाच पैसा सरकार स्वतःकडे घेते, मंदिरांच्याच पैशावर कर लावला जातो; मात्र धर्मनिरपेक्ष सरकार हा न्याय चर्च व मशिदींना का लावत नाही ? जर सरकारला जर जमिनी हव्या असतील तर भारत सरकार नंतर सर्वाधिक जमिनीची मालक असलेल्या वक्फ बोर्डाची लाखो एकर जमीन वर्ग १ मध्ये हस्तांतरित करून ती कब्जेदारांच्या नावाने करण्याचा धाडसी निर्णय घ्यावा.

मंदिरांच्या अनेक भूमीवर अतिक्रमण आणि अधनिकृत बांधकाम झाले आहे; म्हणून असा निर्णय शासन घेणार असेल, तर ‘हा रोगापेक्षा इलाज भयंकर’ असेच म्हणावे लागेल. जर अतिक्रमण झाले असेल, तर ती अतिक्रमणे हटवण्याचे काम सरकारचे आहे. असे न करत त्या जमीनी भोगवाटदार वा कब्जेदारांच्या कायमस्वरूपी मालकी हक्कात देणे अयोग्य आहे. या निर्णयामुळे मंदिरांचे आर्थिक व्यवस्थापन, मंदिराची डागडुजी, रंगकाम, वार्षिक उत्सव आदि सर्वांवर गदा येणार आहे. मंदिरांचे आर्थिक व्यवस्थापन कोलमडणार आहे. हे कोणतेही मंदिर व्यवस्थापन आणि भाविक जनता स्वीकारू शकत नाही. एकीकडे देशातील अनेक भाजप सरकार तेथील मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करून ती भक्तांच्या स्वाधीन करण्याचा विचार करत आहे. मंदिरांना आर्थिक साहाय्यता करत आहेत. असे असताना महाराष्ट्रात मात्र मंदिरांच्या जमिनीबाबत अशी भूमिका का ? हा प्रश्न समस्त मंदिर विश्वस्तांना पडला आहे. समस्त मंदिर विश्वस्त, पुजारी आणि मंदिर प्रतिनिधी यांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने सदर निर्णय घेऊ नये अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.

Tags: जमिनीमंदिरसरकार
ShareSend
Previous Post

रत्नागिरीत हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे लव्ह जिहादविरोधी  आंदोलन

Next Post

सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचे ‘एक ना धड भाराभर चिंध्या’!

yogesh

yogesh

Related Posts

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती
माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

March 2, 2026
मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर
माझा महाराष्ट्र

मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

February 20, 2026
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझा महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 18, 2026
Next Post

सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचे 'एक ना धड भाराभर चिंध्या'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us