• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

दयानंद चौगुले खून प्रकरण : उच्च न्यायालयाची चौघांना नोटीस

yogesh by yogesh
July 30, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

मुंबई : प्रतिनिधी

रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील ग्रामस्थ दयानंद चौघुले खून प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने प्रकरणातील आरोपी महेंद्र झापडेकर यांच्यासह चौघांना आपले म्हणणे सादर करण्याची नोटीस बजावली आहे. दयानंद चौघुले यांचा खून १० फेब्रुवारी २०१७ रोजी झाला होता. या प्रकरणात आरोपींना ३२३, १४३,१४९ या कलमान्वये सर्वांना सहा महिन्याची शिक्षा तसेच दंड ठोकवण्यात आला. परंतु न्यायालयाने कलम ३०४, ५०४, ५०६ कलमा अंतर्गत पुराव्या अभावी मुक्तता केली होती. या दिनांक १४ जुलै २०२२ रोजी रत्नागिरी सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात तक्रारदार रामचंद्र चौगुले यांनी ॲड. राकेश भाटकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्याची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात झाली. त्यानुसार उच्च न्यायालयाकडून आरोपींना नोटीस बजावण्यात आली आहे.

रामचंद्र चौगुले यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ९ फेब्रुवारी २०१७ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास महेश शिंदे,  कुमार शिंदे , किशोर शिंदे आणि महेंद्र झापडेकर हे त्यांच्या घरी पाली येथे आले होते आणि रामचंद्र यांचा मुलगा चिन्मय यांने मुलीला मेसेज केल्या संदर्भात लोकांची तक्रार आहे. त्यामुळे उद्या सकाळपर्यंत त्याला आमच्या चांदेराई येथील गावात येऊन माफी न मागितल्यास त्याचे काय करायचे ते बघतो अशी धमकी दिली होती.  यावर दिनांक १० फेब्रुवारी २०१७ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजताचे सुमारास रामचंद्र, मुलगा चिन्मय, त्यांचा भाऊ दयानंद, गुरुप्रसाद तसेच इतर मित्र हे कुमार शिंदे यांच्या चांदेराई येथील घरी माफी मागण्यासाठी गेले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही माफी मागायला आलो आहोत असे सांगितले. परंतु त्यांचे म्हणणे ऐकून न घेता रामचंद्र यांचा मुलगा चिन्मय याला मारहाण करायला आरोपींनी सुरुवात केली. चिन्मयला वाचवण्यासाठी काका दयानंद चौगुले मध्ये गेले असता त्याला महेंद्र झापडेकर, कुमार शिंदे, महेश शिंदे, किशोर शिंदे, प्रणव शिंदे यांनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यात दयानंद याच्या छातीत जोरदार आघात केल्यामुळे दयानंद जागीच कोसळला. त्यानंतर रामचंद्र तसेच इतर यांनी दयानंद याला गाडीमध्ये घेऊन सिविल हॉस्पिटल रत्नागिरी येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून दयानंद चौगुले याला मृत घोषित केले होते. त्यामुळे कुमार शिंदे,  महेश शिंदे, किशोर शिंदे, प्रणव शिंदे आणि महेंद्र झापडेकर यांच्याविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड विधानसंहीतेच्या कलम ३०२, १४३, १४७, ३२३, ५०४ आणि ५०६ अन्वये  गुन्हा दाखल करण्यात आला त्याची प्रकरणाची सुनावणी होऊन त्यामध्ये आरोपींना ३२३, १४३,१४९ या कलमान्वये सर्वांना सहा महिन्याची शिक्षा तसेच दंड ठोकवण्यात आला. परंतु न्यायालयाने कलम ३०४, ५०४, ५०६ कलमा अंतर्गत पुराव्या अभावी मुक्तता केली होती. या दिनांक १४ जुलै २०२२ रोजी रत्नागिरी सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात तक्रारदार रामचंद्र चौगुले यांनी ॲड. राकेश भाटकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्याची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात झाली.  मुंबई उच्च न्यायालयाने अपिलामध्ये दाखल केलेले मुद्दे , असलेल्या पुराव्याची पडताळणी करत महेश शिंदे, किशोर शिंदे, प्रणव शिंदे तसेच महेंद्र झापडेकर या आरोपींना आपले म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आदेश केले असून आठ आठवड्यानंतर या अपिलाची सुनावणी ठेवली आहे.

Tags: दयानंद चौघुले खूनरत्नागिरी
ShareSend
Previous Post

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नकन्या गौरी विलणकर रवाना

Next Post

रत्नागिरी जिल्ह्यात मिळणार बीएसएनएलची सुलभ सेवा

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post

रत्नागिरी जिल्ह्यात मिळणार बीएसएनएलची सुलभ सेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us