प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर : गोगटे जोगळेकर महाविद्यालय योगदिन साजरा
रत्नागिरी : प्रतिनिधी
येथील गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात १० व्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विविध योगासने करून या उपक्रमात सहभाग घेतला. योग अभ्यासक व योगगुरू श्रीमती नीता विनय साने व त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकांद्वारे उपस्थित योग साधना करून घेतली. उपक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी गेल्या १० वर्षांपासून जगातील १७५ हून अधिक देश योग दिनाच्या उपक्रमात कसा सहभाग घेत आहेत आणि आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग साधनेचा वापर केला पाहिजे, असे आवाहन केले.
गोगटे – जोगळेकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना, अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभागातील प्रशिक्षक व योग अभ्यासक २०० विद्यार्थी यांनी यात सहभाग घेतला. नागरिकांना संपूर्ण आरोग्य व शांती यासाठी जागतिक पातळीवर योग प्रचार व योग अभ्यास यासाठी हा उपक्रम राबविला जातो. क्रीडा प्रशिक्षक डॉ. विनोद शिंदे, क्रीडा प्रशिक्षक लीना घाडीगावकर, राकेश मलाप, डॉ. दानिश गनी , प्रा. उमा जोशी, प्रा. हर्षदा पटवर्धन, प्रा. सचिन सनगरे, प्रा. निनाद तेंडूलकर, प्रा. पंकज घाटे, डॉ. दिवाकर करवंजे या वेळी उपस्थित होते.