• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home साहित्य

वळण…

yogesh by yogesh
May 24, 2024
in साहित्य
A A
0

वळण, ज्याला हिंदीत मोड म्हणतात आणि इंग्लिशमध्ये टर्न म्हणतात. हो तेच ते शब्द अनेकदा वापरतो आपण. पण असं असूनही घाबरतो त्यांना सामोरे जाताना.
वळणा वळणाने होणारा घाटातला प्रवास कोणाला सुख देतो तर कोणाला त्रास. वळण दिशा बदलतं, प्रवाह बदलतं अनेकदा योग्य मार्गावर आणून सोडतं.
आपण वळणावर थोडे थांबतो, अवघडतो, किंचितसे साशंक होतो. का ? मला वाटतं त्याचं कारण असावं वळणापालिकडे बघता न येण्याची आपली मर्यादा. या वळणापालिकडे आपल्यासाठी काय वाढून ठेवलंय हे माहीत नसल्याने सतत धाकधूक असते मनात. पण म्हणून वळणं टाळता येणार नाहीत. किंबहुना ती टाळूच नयेत असं मला वाटतं. प्रत्येक वळणावर नवीन काहीतरी शिकायला मिळतं. यश मिळतं नाहीतर अनुभवाचं गाठोडं तरी वाढतच.
असं हे वळण आपल्या आयुष्यात काही वेळा वादळ पण निर्माण करते. काय चूक काय बरोबर हेच कळेनासे होते. सर्व जग धूसर बनून जातं. कोण आपलं कोण परकं हेच कळत नाही किंवा फारच नीट कळतं.
वळण ओलांडणं हे जसं कसब आहे तसच ते ओलांडल्यावर अनुभव साठवणं हे पण एक कसब आहे. अनेकदा थ्रिल हवं हवं म्हणून आपणच वळणं निर्माण करतो आपल्या आयुष्यात; नाही का? आणि ही अशी उत्पन्न झालेली वळणं पार करताना आपली नक्कीच जरा जास्तच दमछाक होते.
पण नंतर वळणावरून मागे वळून पाहताना आपल्याला दिसतो तो कॅलिडोस्कोप. विविध पॅटर्नसचा. भावनांचे, कृतींचे, नात्यांचे, प्रेमाचे, आपुलकीचे, मित्रत्वाचे, वैराचेसुद्धा. आणि हेच विविध पॅटर्नस आपल्याला बळ देतात पुढल्या वळणावर पार व्हायला.
वळणावरून काही वेळा परत फिरुया असं वाटतं. यू टर्न घेऊयात का? असही वाटत असतं. काही वेळा तो निर्णय योग्यही असतो पण जीवन म्हणजे पुढे पुढे जाणेच ना. मग वळणाला घाबरून किंवा अवघडून किंवा कंटाळून about turn का घ्या? वळणावरून पुढे होऊ. कोण जाणे पुढचं वळण सुखद असेल, हवं हवंसं असेल!

असा हा आपला वळणावळणाचा प्रवास एका अशा वळणावर येऊन थांबतो की जिथून परतीची वाट नाही. या वळणावर जीवनाची सार्थकता ज्याला पटली त्याचे जीवन सफल झाले. अशाच व्यक्ती आदरणीय आणि अनुकरणीय ठरतात. नाही का?
खूप वळणदार प्रवास करत करत अंताकडे येताना जरा दमला असाल तर या, जरा या वळणावर विसावूयात!

– उमा जोशी

Tags: तुमच्या माझ्या मनातलंललितलेखस्फुट
ShareSend
Previous Post

देशातील ५८ जागावर २५ रोजी मतदान

Next Post

मनुस्मृतीचा श्लोक वेळीच शिकवला असता, तर राष्ट्रवादी काँग्रेसवर फुटीची वेळ आली नसती !

yogesh

yogesh

Related Posts

साहित्य

प्रा. सनगरेंची कविता निसर्गभान देणारी : डॉ. चित्रा गोस्वामी

July 15, 2024
साहित्य

प्राजक्त…!

July 12, 2024
साहित्य

परिवर्तन

June 29, 2024
साहित्य

२१ जूनचा योगायोग

June 21, 2024
Next Post

मनुस्मृतीचा श्लोक वेळीच शिकवला असता, तर राष्ट्रवादी काँग्रेसवर फुटीची वेळ आली नसती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us