• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Friday, July 17, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा हिंदुस्थान

रत्नागिरीत ३ मे रोजी गृहमंत्री अमित शहा यांची सभा

yogesh by yogesh
May 1, 2024
in माझा हिंदुस्थान, माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शहा यांची तोफ धडाडणार आहे. अमित शहा सभेनिमित्त प्रथमच येत असून येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विराट सभा होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री, भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी दिली.

उमेदवार नारायणराव राणे यांच्या प्रचारासाठी यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राजापूर येथे सभा घेतली. आता अमित भाई शहा येणार आहेत. ३ मे रोजी दुपारी एक वाजता ही सभा होणार आहे. या सभेकरिता मंडप व्यवस्था पूर्ण झाली आहे. पूर्ण मैदानावर मंडप आहे, या ठिकाणी हजारो लोक एका वेळेला बसू शकतात. या सभेकरिता नियोजन करण्यात आले आहे. सभेला येणाऱ्या लोकांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. महायुतीतील सर्व पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी नेतेमंडळी या सभेकरता उपस्थित राहणार आहेत. सहा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने रत्नागिरीत दाखल होणार आहेत, असे ना. रवींद्र चव्हाण म्हणाले.
महायुतीसाठी पोषक वातावरण असून नारायण राणे विजय घोडदौड चालू ठेवतील. ही सभा ऐतिहासिक सभा होण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या सभेला तुफान गर्दी होणार, असा विश्वास ना. चव्हाण यांनी व्यक्त केला.
यापूर्वी अमित भाई शहा यांची सभा २४ एप्रिल रोजी होणार होती. मात्र हा नियोजित दौरा पुढे ढकलण्यात आला होता. आता ही सभा ३ मे रोजी होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून केंद्रीय गृहमंत्री रत्नागिरी देण्यात असल्यामुळे त्यांच्या जंगी स्वागताची तयारी करण्यात येत आहे.
नारायणराव राणे यांच्या प्रचाराच्या सभा सर्व ठिकाणी होत असून प्रत्येक बुथवर कार्यकर्ता सक्रिय झाला आहे. आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, किरण सामंत, लोकसभा सहप्रभारी तथा माजी आमदार बाळासाहेब माने, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, लोकसभा प्रभारी प्रमोद जठार, राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजश्री विश्वासराव, प्रमोद अधटराव यांच्यासमवेत सर्व विधानसभा प्रमुख सर्व पदाधिकारी सक्रिय नियोजन करत आहेत.

Tags: ४००पारamit shahaBharatbjpDevendra fadanviskonkanmodi sarkarnarayan Ranenilamtai RaneRatnagiriravindra chavhan
ShareSend
Previous Post

महायुतीच्या प्रचारासाठी ना. रवींद्र चव्हाण रत्नागिरी दौऱ्यावर

Next Post

शिक्षकांना मिळणार तब्बल १२८ सुट्टया

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. भैय्या सामंत इफेक्ट : लांजा शहराच्या विकासासाठी २० कोटी मंजूर

July 14, 2026
‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!
माझी रत्नागिरी

‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!

July 6, 2026
‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार
माझी रत्नागिरी

‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार

July 4, 2026
चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन
माझी रत्नागिरी

चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन

July 4, 2026
Next Post

शिक्षकांना मिळणार तब्बल १२८ सुट्टया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us