• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

राज ठाकरेंची पहिली सभा सिंधुदुर्गात !

yogesh by yogesh
April 29, 2024
in माझा महाराष्ट्र
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली होती. राज ठाकरेयांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यभरात सभा घेत झंझावात निर्माण करतील, अशी आशा होती. परंतु, अद्यापपर्यंत राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकदाही महायुतीच्या व्यासपीठावर दिसलेले नाहीत. परंतु, लवकरच राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांची पहिली सभा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ शकते.

राज ठाकरे हे भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरु शकतात, असे सांगितले जात आहे. ४ मे रोजी सिंधुदुर्गात राज ठाकरे यांची सभा होऊ शकते, अशी माहिती मनसे कार्यकर्त्यांकडून मिळत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात मनसेचे कार्यकर्ते अगोदरच नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कामाला लागले आहेत. रत्नागिरीमध्ये नुकतीच मनसेच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी सभा घेतली होती. त्यानंतर येत्या एक-दोन दिवसांमध्ये स्वत: राज ठाकरे सिंधुदुर्गात सभा घेऊन येथील प्रचारात रंग भरु शकतात. राज ठाकरे यांनी कोकणात सभा घेतल्यास ते याठिकाणी काय बोलणार, कोणावर टीका करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रविवारी रत्नागिरी-सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी अविनाश जाधव यांच्यासह मनसेचे प्रमुख नेते उपस्थित होते. या सभेत उदय सामंत आणि नारायण राणे यांनी सभेसाठी राज ठाकरे अनुपस्थित असल्याची खंत बोलून दाखवली होती. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे नाहीयेत, त्यामुळे त्यांची आठवण येते. राज ठाकरे यांचे आभार, मनसेने माझ्यासाठी भव्य सभा आयोजित केली, असे नारायण राणे यांनी म्हटले होते.

Tags: bjpDevendra fadanvismnsRaj thakrey
ShareSend
Previous Post

उबाठात तू-तू मैं-मैं!

Next Post

महायुतीच्या प्रचारासाठी ना. रवींद्र चव्हाण रत्नागिरी दौऱ्यावर

yogesh

yogesh

Related Posts

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती
माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

March 2, 2026
मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर
माझा महाराष्ट्र

मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

February 20, 2026
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझा महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 18, 2026
Next Post

महायुतीच्या प्रचारासाठी ना. रवींद्र चव्हाण रत्नागिरी दौऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us