• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

आधार कार्ड घरबसल्या अपडेट करता येणार!

yogesh by yogesh
April 24, 2024
in माझा महाराष्ट्र, माझा हिंदुस्थान, माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी: प्रतिनिधी

आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. कोणतेही शासकीय अथवा निमशासकीय काम आधार कार्ड विना पूर्ण होत नाही. आधार कार्ड हे एक महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज आहे हे आपल्याला समजते. मात्र हे शासकीय दस्तऐवज अपडेटेड असणे आवश्यक आहे.
आधार कार्डमध्ये असणारी माहिती अपडेटेड असली तरच याचा उपयोग होतो. जर आधार कार्ड अपडेट केलेले नसेल तर तुमची अनेक महत्त्वाची कामे अटकू शकतात. दरम्यान आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिलेली आहे.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडून भारतीय नागरिकांना आधार कार्ड उपलब्ध करून दिले जात आहे.हे कार्ड जर १० वर्षांपूर्वी बनवलेले असेल तर ते अपडेट करणे आवश्यक आहे. खरेतर आधारकार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा १४ मार्चपर्यंत उपलब्ध होती. मात्र ही सुविधा नागरिकांच्या सोयीसाठी आणखी वाढविण्यात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठीची अंतिम मुदत १४ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.
यामुळे जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये कोणतीही माहिती अपडेट करायची असेल, तर तुम्ही कोणतेही शुल्क न भरता अपडेट करू शकता. दरम्यान आता आपण घरबसल्या आधार कार्ड विनाशुल्क कसे अपडेट करायचे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

आधार कार्ड घरबसल्या कसे अपडेट करणार*
myAadhaar Portal वर आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यासाठी सर्व प्रथम uidai च्या अधिकृत वेबसाइटवर अर्थातच https://uidai.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागणार आहे. या अधिकृत संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर तुम्हाला याच्या होमपेजवरील My Aadhaar Portal वर जावे लागणार आहे.
मग आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर मिळालेला OTP वापरून लॉग इन करायचे आहे. एकदा की या वेबसाईटवर तुम्ही लॉगिन घेतली की तुम्हाला तुमचे आधार कार्ड मधील तपशील अपडेट करता येणार आहेत. यासाठी तुम्हाला तुमचे तपशील तपासायचे आहेत आणि तपशील योग्य असल्यास, योग्य बॉक्सवर टिक करायची आहे.
जर डेमोग्राफिक माहिती चुकीची असेल किंवा तुम्हाला तुमच्या डेमोग्राफिक माहितीमध्ये काही बदल करायचे असतील तर ड्रॉप-डाउन मेनूमधून ओळख दस्तऐवज निवडून दस्तऐवज अपलोड करावे लागणार आहेत. हे दस्तऐवज JPEG, PNG आणि PDF स्वरूपात अपलोड केले जाऊ शकतात. पण, मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त माय गाआधार पोर्टलवर उपलब्ध आहे.
जर तुम्ही तुमच्या जवळील सीएससी सेंटरवर जाऊन किंवा आधार सेंटरवर जाऊन आधार कार्ड अपडेट करत असाल तर तुम्हाला यासाठी पन्नास रुपये एवढे शुल्क द्यावे लागणार आहेत. तसेच तुम्हाला तुमच्या आधार कार्डमधील बायोमेट्रिक अपडेट करायचे असतील तर यासाठी तुम्हाला फक्त आधार सेंटरवर जाऊनच हे काम करता येणार आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला शंभर रुपये एवढे चार्जेस द्यावे लागणार आहेत.

Tags: aadharuidaiupdateआधारआधारकार्ड
ShareSend
Previous Post

हिंदूंनो, प्रखर हिंदुत्ववादी उमेदवाराला मतदान करा!

Next Post

पंतप्रधान उज्वला योजनेमुळे गॅस लाभार्थ्यात वाढ!

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
Next Post

पंतप्रधान उज्वला योजनेमुळे गॅस लाभार्थ्यात वाढ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us