• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Sunday, April 12, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

कुणाच्या खांद्यावर ठेक्याचे ओझे?

रत्नागिरी पालिकेची मंजुरी नसताना ५० लाखांचे काम ७०% पूर्ण : केतन शेट्ये

yogesh by yogesh
February 27, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी नगरपालिकेत भ्रष्टाचाराचा आणि अनागोंदी कारभाराचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या ५० लाख रुपयांच्या ‘डॉग शेल्टर’चे काम कोणत्याही प्रशासकीय मंजुरीशिवाय ७० टक्के पूर्ण झाले आहे. हा प्रकार समोर येताच शिवसेना उबाठाचे नगरसेवक केतन शेट्ये यांनी आक्रमक पवित्रा घेत एका ‘अज्ञात’ ठेकेदाराचा हा मोठा आर्थिक डाव उधळून लावला आहे. त्यामुळे हा प्रकार पाहून कोणाच्या खांद्यावर ठेक्याचे ओझे ही नवीन म्हण प्रचलित होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी नगरपालिकेकडून डॉग शेल्टर उभारण्याचे नियोजित होते. मात्र, या कामासाठी लागणारी अधिकृत निविदा प्रक्रिया (Tendering), तांत्रिक मंजुरी किंवा कार्यादेश (Work Order) अद्याप पूर्ण झालेली नाही. असे असतानाही, एका खाजगी ठेकेदाराने पालिकेच्या जागेत हे काम सुरु केले आणि पाहता पाहता ७० टक्क्यांहून अधिक बांधकाम पूर्ण केले. धक्कादायक बाब म्हणजे, पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत हे काम सुरू असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

शिवसेना उबाठाचे नगरसेवक केतन शेट्ये यांनी या प्रकरणाची कागदपत्रे तपासली असता, या ५० लाखांच्या कामाची कोणतीही नोंद पालिकेच्या दप्तरी नसल्याचे समोर आले. “कोणत्याही मंजुरीशिवाय इतके मोठे काम झालेच कसे? आणि जर हे काम अधिकृत नाही, तर यावर होणारा खर्च कोणाच्या खिशातून जात आहे?” असे सवाल शेट्ये यांनी उपस्थित केले आहेत. या प्रकरणामागे कोणाचे वरदहस्त आहेत, याची चर्चा आता रत्नागिरीत रंगली आहे.

विनापरवाना सुरू असलेल्या या कामामुळे पालिकेचे नियम आणि पारदर्शकता धाब्यावर बसवली गेल्याचे स्पष्ट होत आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी आणि ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. आता यावर नगरपालिका प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: भ्रष्टाचाररत्नागिरीरत्नागिरी नगर परिषद
ShareSend
Previous Post

७/१२ नोंदीसाठी १० हजारांची लाच घेताना महिला तलाठी जाळ्यात

Next Post

मुंबई-गोवा महामार्ग कामात दिरंगाई, २ ठेकेदारांना १६ कोटींचा दंड

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post

मुंबई-गोवा महामार्ग कामात दिरंगाई, २ ठेकेदारांना १६ कोटींचा दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us