• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Sunday, April 12, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

७/१२ नोंदीसाठी १० हजारांची लाच घेताना महिला तलाठी जाळ्यात

yogesh by yogesh
February 25, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

दापोली : प्रतिनिधी
जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर फेरफार नोंद करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका महिला ग्राम महसूल अधिकाऱ्याला (तलाठी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. बुधवारी (२५ फेब्रुवारी २०२६) दापोली येथील तहसीलदार कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.श्रद्धा बालाजी बंडे (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव असून, त्या नानटे येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या मित्राने मौजे तेरेवायंगणी येथे भागीदारीत एक जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर फेरफार नोंद करून त्याची प्रत मिळवण्यासाठी तक्रारदाराने तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. हे शासकीय काम करण्यासाठी तलाठी श्रद्धा बंडे यांनी तक्रारदाराकडे १०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता, लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पथकाने दापोली तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. बुधवारी ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून १० हजार रुपये स्वीकारताना श्रद्धा बंडे यांना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव आणि सुहास रोकडे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Tags: तलाठीमहसूललाचलाचखोरीलाचलुचपत प्रतिबंधक विभाग
ShareSend
Previous Post

बँक कर्मचाऱ्याला मारहाण; अल्ताफ संगमेश्वरीसह तिघांवर ‘ॲट्रॉसिटी’

Next Post

कुणाच्या खांद्यावर ठेक्याचे ओझे?

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!

कुणाच्या खांद्यावर ठेक्याचे ओझे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us