• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

कुठे उष्णतेची लाट तर कुठे वादळी वाऱ्यासह पाऊस?

yogesh by yogesh
April 23, 2024
in माझा महाराष्ट्र
A A
0

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तर काही भागात उष्णतेची लाट आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. आजही राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातून वाफेचे उष्ण वारे किनाऱ्यावर येत असल्याने पुढील काही दिवस किनारपट्टी भागात तापमानात वाढ होणार आहे. आर्द्रता वाढल्यामुळे असह्य उष्ण हवामानाचा सामना करावा लागेल.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, २३ आणि २४ एप्रिल रोजी राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. २३ आणि २५ एप्रिल रोजी कोकण आणि गोवा वगळता इतर राज्यात पावसाची शक्यता आहे. कोकणात आजपासून पुढील पाच दिवस उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. आज मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील. आणि गारपिटीसह पावसाची शक्यता आहे.
मुंबई आणि पुण्यात कसं असेल हवामान ?
पुण्यात आज अंशत: ढगाळ राहून मेघ गर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होईल. त्यानंतर दोन दिवस आकाश बहुतांशी निरभ्र राहील.मुंबईसह कोकण किनारपट्टीला पुन्हा एकदा तापमान वाढीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळं नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. अरबी समुद्रातून येणारे दमट उष्ण वारे किनाऱ्याकडे सरकणार असल्याने गुरुवार, २५ एप्रिलपर्यंत किनारपट्टीवर उष्णता जाणवेल.

Tags: उष्णताऊनपाऊसपारावादळ
ShareSend
Previous Post

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महायुतीची बैठक

Next Post

अवघ्या ८ मिनिटात कशेडी घाटाचे अंतर कापता येणार!

yogesh

yogesh

Related Posts

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती
माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

March 2, 2026
मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर
माझा महाराष्ट्र

मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

February 20, 2026
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझा महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 18, 2026
Next Post

अवघ्या ८ मिनिटात कशेडी घाटाचे अंतर कापता येणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us