रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने रत्नागिरी येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.
“रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचाच विजयी गुलाल उधळला जाणार, या निर्धारातून जोमाने काम सुरू करा. निवडणुकीच्या प्रचाराचे योग्य पद्धतीने नियोजन करा, तसेच बूथवरील रचनाही काटेकोरपणे लावा,” असे आवाहन यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना केले.
या बैठकीला माजी आमदार बाळ माने, शिवसेनेचे किरण उर्फ भैय्या सामंत, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह महायुतीच्या सर्व घटकपक्षांतील पदाधिकारीही उपस्थित होते.