• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

सुसाट थारची रिक्षाला धडक, पाच जण ठार

yogesh by yogesh
August 19, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
सुसाट थारची रिक्षाला धडक, पाच जण ठार

रत्नागिरी : प्रतिनिधी

मुसळधार पाऊस सुरु असतानाच चिपळूण कराड मार्गावर पिंपळी येथे ट्रक, रिक्षा आणि थार गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अडीच वर्षीय चिमुरड्याचाही समावेश आहे. सोमवारी रात्री उशिरा दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

रिक्षा आणि थार एकमेकांना चुकवत असताना समोरुन येणाऱ्या ट्रकला आदळल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रिक्षा चालक पिंपळी परिसरातील असून लहान मुलासह तिघे जण प्रवास करत होते. या चौघांनाही प्राण गमवावे लागले. याशिवाय ट्रकवर गाडी आदळल्याने थार चालकाचाही जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की थार गाडी आणि रिक्षा यांचा चक्काचूर झाला.

हरियाणा राज्यातील पासिंग असलेल्या थार गाडीतून एका मुलीला घेऊन कार चालक सुसाट निघाला होता, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. याच वेळेला ती मुलगी ‘मला वाचवा’ असं ओरडत असल्याचीही चर्चा आहे. थार चालकाने त्या मुलीला वाटेत सोडलं आणि तो सुसाट निघाला होता. त्याचवेळी हा अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत ती मुलगी सुखरुप बचावली.

या अपघातात शबाना मियां सय्यद, हैदर नियाज सय्यद, नियाज हुसेन सय्यद, रिक्षा चालक इब्राहिम इस्माईल लोणी या चौघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. हे चारहीजण पिंपळी मोहल्ला येथील आहेत. यामध्ये रिक्षा चालक वगळता कुटुंबातील तिघांचाही समावेश असून आई-वडील व मुलगा या तिघांचाही दुर्दैवीरित्या जागीच मृत्यू झाला आहे. थार गाडी चालकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. त्याची ओळख पाठविण्याच काम पोलिसांकडून सुरू आहे.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच तात्काळ चिपळूणचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. बेले, पोलीस निरीक्षक श्री. मेंगडे आदी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाल आहे. रात्री उशिरापर्यंत स्थानिक नागरिक व पोलिसांकडून या ठिकाणी मदतकार्य सुरू होतं. या अपघाताची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

Tags: अपघातठारराजापूर
ShareSend
Previous Post

रत्नागिरी नगर परिषद : प्रभाग १४ मध्ये भाजपकडून संकेत सुगंध चवंडे चर्चेच्या केंद्रस्थानी

Next Post

सुर्यमंदिरावरुन फेक नरेटिव्ह करून बदनाम करण्याचा प्रयत्न : पालकमंत्री उदय सामंत

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
सुर्यमंदिरावरुन फेक नरेटिव्ह करून बदनाम करण्याचा प्रयत्न : पालकमंत्री उदय सामंत

सुर्यमंदिरावरुन फेक नरेटिव्ह करून बदनाम करण्याचा प्रयत्न : पालकमंत्री उदय सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us