रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग १४ मध्ये भाजप शहर उपाध्यक्ष संकेत सुगंध चवंडे यांचे नाव जोरदार गाजत असून, स्थानिक राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. संकेत चवंडे हे सर्वच बाजूनी स्ट्रॉंग असल्याने आणि साम दाम दंड भेद रणनीतीचा उत्तम मिलाफ असल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
स्वाभिमान पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून कार्य केलेले संकेत सुगंध चवंडे हे राणे कुटुंबाचे विश्वासू आणि खंदे कार्यकर्ते म्हणून शहरभर परिचित आहेत. आमदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यासोबत राजकीय मैदानात खांद्याला खांदा लावून काम केल्यामुळे त्यांना प्रभागात चांगली पकड मिळालेली आहे. सध्या भाजपचे शहर उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जनसामान्यांशी असलेला संवाद अधिक घट्ट केला आहे. विविध समाजाच्या प्रश्नावर संकेत सुगंध चवंडे यांनी निलेश राणे यांच्या सोबतीने खांद्याला खांदा लावून आंदोलने केली आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा प्रभागात आहे.
प्रभागातील लहानसहान प्रश्नांपासून दैनंदिन अडचणींपर्यंत नेहमी धावून येणारा कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा असून, नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवाच्या आयोजनाने त्यांच्या लोकप्रियतेत आणखी भर टाकली. खडपे वठार, मांडवी, घुडे वठार, चवंडे वठार भागात लावलेले त्यांच्या बॅनरमुळे निवडणुकीची चाहूल अधिकच तीव्र झाली आहे. युती झाली अथवा नाही, संकेत सुगंध चवंडे यांना भाजपकडून तिकीट निश्चित मिळेल, असे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांतून “या वेळेस प्रभाग १४ मध्ये भाजपचा झेंडा फडकवायचा” अशी गर्जना सुरू झाली आहे.




