• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

पगार एसटीचा, प्रचार खासगी वाहतुकीचा! कर्मचारी जोमात, एसटी कोमात!

yogesh by yogesh
July 18, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
पगार एसटीचा, प्रचार खासगी वाहतुकीचा! कर्मचारी जोमात, एसटी कोमात!

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी एसटी महामंडळाच्या विभागात अनेक कारनामे सुरू आहेत. एसटी तोट्यात म्हणून बोंबाबोंब करणारे असे कारनामे झाकून ठेवत आहेत. एसटीच्या पगारात नोकरी करून खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालविणारे अनेक सचिन तयार झाले आहेत. इतर कर्मचाऱ्यांची विकेट पाडण्यात माहीर असलेले हे सचिन कधीतरी स्वतःकडे बघणार आहेत की नाही? सायबाच्या आशीर्वादाने माजलेल्या एसटी आरामविरांकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक लक्ष घालणार आहेत की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आपल्याच सहकाऱ्यांना त्रास द्यायचा आणि आम्ही सायबाची माणसे आहोत, असा गमजा मिरवायचा, असले प्रताप सुरू आहेत. सायबाला यातली काहीही कल्पना नसताना सायबाच्या जीवावर सचिन उदार असली परिस्थिती एसटी विभागीय कार्यालयात झाली आहे. सध्या इथे नोकरी करणारे कर्मचारीच आपल्या खासगी वाहने घेऊन टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या चालवत आहेत. त्याच्या रीतसर जाहिराती सोशल मीडियावर प्रसारित करत आहेत. एसटीचा पगार घ्यायचा आणि खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन द्यायचे असले प्रताप सुरू आहेत. यावर कोणताही अधिकारी ॲक्शन का घेत नाही, हाही संशोधनाचा विषय आहे.

अधिक माहिती घेतली असता, कोणत्याही अधिकारी यावर ॲक्शन घ्यायला गेला तर आम्ही साहेबांची माणसं आहोत, साहेबाला बोलून तुमच्यावर चढायला लावू असली भाषा हे आरामवीर सचिन करत आहे. दुसऱ्यांची विकेट काढायची आणि त्यावरती आनंद उत्सव साजरा करायचा असली पद्धत एसटीमध्ये सुरू झाली आहे. आमच्यामागे साहेबांचा हात आहे अशा वल्गना हे आरामवीर करत असतात. त्यामुळे अधिकारीही कारवाई करण्यास घाबरत असल्याचे समजते.

शिस्तभंग कारवाई करणार का?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ही एक शासकीय उपक्रम असलेली सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. एसटी चालक, वाहक, नियंत्रण अधिकारी आणि इतर कर्मचारी हे शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जात मोडतात. त्यामुळे त्यांच्यावर काही विशिष्ट सेवा नियम लागू होतात. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना खाजगी व्यवसाय चालवण्यास बंदी आहे. महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रुल्सनुसार, कोणताही शासकीय कर्मचारी नोकरीत असताना दुसरा व्यवसाय करू शकत नाही. अनुमतीशिवाय व्यवसाय केल्यास शिस्तभंग कारवाई करता येते. जर कर्मचारीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता टूर्स अँड ट्रॅव्हल्ससारखा व्यवसाय सुरू केला, तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते – निलंबन, वेतनवजा, किंवा सेवेतून काढून टाकणे यासारखे उपाय होऊ शकतात. एसटी कर्मचाऱ्यांनी जर स्वतःची ट्रॅव्हल कंपनी चालवली, तर ती एसटीच्या सेवेबरोबर थेट स्पर्धा करू शकते, जी हितसंबंधाच्या संघर्षात (Conflict of Interest) मोडते. कंपनी कुटुंबातील सदस्यांच्या नावे असली तरी इथे सोशल मीडियावर त्याची जाहिरात एसटी कर्मचारी करत आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार? हा सवाल उपस्थित होत आहे.

Tags: एसटीएसटी कर्मचारीप्रताप सरनाईकमुख्यमंत्री
ShareSend
Previous Post

आमदार हाणामारी करायला जातात की लोकांच्या व्यथा मांडायला?

Next Post

अबब! दीड कोटीचे शौचालय!

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
अबब! दीड कोटीचे शौचालय!

अबब! दीड कोटीचे शौचालय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us