रत्नागिरी : प्रतिनिधी
शहर भाजपचे सरचिटणीस मंदार मयेकर यांच्या पुढाकाराने आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत विविध पक्षातील पेठकिल्ला येथील नागरिकांचा भाजपात प्रवेश झाला.
प्रवेशकर्त्या नागरिकांमध्ये रुपेश सुर्वे, सिद्धार्थ मयेकर, सुशांत शिवलकर, नितिकेश मेटकर, प्रीतम सुर्वे, शुभम विलणकर, सुरेश नंदाने, प्रतिभा नंदाने, स्वप्नाली विलणकर यांचा समावेश होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन आम्ही प्रवेश करत असल्याचे प्रवेशकर्त्यानी यावेळी सांगितले.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक मयेकर, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हा चिटणीस दादा ढेकणे, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर सरचिटणीस मंदार खंडकर, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




