रत्नागिरी : प्रतिनिधी
तुम्हाला माहिती असेल, रुग्णांना ज्यावेळी रक्ताची आवश्यकता असेल, त्यावेळी त्यांना तातडीने रक्त उपलब्ध होत नाही. तसेच अनेकदा दुर्मिळ रक्तगट असलेल्या रुग्णांना तातडीने रक्तच मिळत नाही. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होते, हि गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णांसाठी रक्ताचा शोध घेणे होणार सोपे होणार आहे.
यासाठी शासनाने ई-रक्तकोष हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. त्याद्वारे एकाच क्लिकवर रुग्णांना त्यांच्या जवळच्या रक्तपेढीची, त्यातील रक्ताची उपलब्धता याची माहिती मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना रक्त संकलनाची माहिती अद्ययावत करून ती ई-रक्त कोष या संकेतस्थळावर दररोज अपडेट करण्याची सूचना केल्या आहेत. त्यानुसार आता सर्व रक्त पेढ्यांना दररोज सकाळी दहा वाजेपर्यंत अपडेटेड माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाने एक वेबसाईट तयार केली असून त्यावर दररोज डेटा अपडेट होत असतो. लाखो लोकांनी यावर नोंदणी केली असून त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी मदत होणार आहे. या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. अधिक नोंदणी व माहितीसाठी https://www.eraktkosh.in या लिंकवर क्लिक करा.