रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील टेंब्ये येथील समाजसेवक नंदकुमार भार्गव साळवी यांनी आपल्या ७० व्या वाढदिवसानिमित्त एक प्रेरणादायी उपक्रम राबवित जिल्हा रुग्णालयास दोन व्हीलचेअर भेट दिल्या. रुग्णसेवेच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगताप, डॉ. कुमरे यांच्यासह रुग्णालयातील अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांनी साळवी यांच्या सामाजिक बांधिलकीचे मनापासून कौतुक केले आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नंदकुमार साळवी यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, “वाढदिवस साजरा करताना समाजासाठी काहीतरी देण्याची इच्छा होती. त्यामुळे रुग्णालयाला व्हीलचेअर देण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून समाजाच्या ऋणातून थोडेबहुत उतरल्याचे समाधान लाभले.”
रुग्णालय प्रशासनानेही या उपक्रमाबद्दल साळवी यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.





नंदकुमार साळवी यांचा हा प्रेरणादायी उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. समाजसेवेच्या दृष्टिकोनातून ही कृती अत्यंत महत्त्वाची आहे. रुग्णालयातील रुग्णांसाठी व्हीलचेअरची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात त्यांनी खूप मोठेपण दाखवले. त्यांच्या या कार्यामुळे समाजातील इतर व्यक्तींनाही प्रेरणा मिळेल. असा प्रयत्न करताना त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या? Given the growing economic instability due to the events in the Middle East, many businesses are looking for guaranteed fast and secure payment solutions. Recently, I came across LiberSave (LS) — they promise instant bank transfers with no chargebacks or card verification. It says integration takes 5 minutes and is already being tested in Israel and the UAE. Has anyone actually checked how this works in crisis conditions?