• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Thursday, June 4, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझं कोकण

मुंबई-गोवा महामार्गावर मरण स्वस्तच!

yogesh by yogesh
June 15, 2025
in माझं कोकण
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्ग, जो एकीकडे कोकणच्या सौंदर्याला जोडणारा मार्ग मानला जातो, तोच गेल्या १८ वर्षांत मृत्यूचा सापळा ठरला आहे. या कालावधीत झालेल्या अपघातांमध्ये २,५०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून, हजारो जखमी झाले आहेत. ही परिस्थिती महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणावर गंभीर प्रश्न निर्माण करते. २०१० ते २०२१ या कालावधीत अपघातात २,४४२ मृत्यू झाल्याची माहिती पोलिस अहवाल देतो. तर २०१२ ते २०२२ या कालावधीत ६,६९२ अपघात झाल्याची आणि त्यात १,५१२ मृत्यू झाल्याची माहिती सा. बांधकाम विभाग देतो. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता गत वर्षामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातच ३९९ अपघात होऊन १३७ जणांचा मृत्यू झाला आहे.

अपूर्ण चौपदरीकरण, रस्त्याची दुरवस्था व खड्डे, अर्धवट पूल व बायपास, वाहनचालकांची बेदरकार वृत्ती आणि ठेकेदाराचे लांगुलचालन ही या अपघातांची कारणे आहेत. महामार्गाचे काम वर्षानुवर्षे चालू आहे, पण अपघात मात्र थांबत नाहीत. प्रत्येक आठवड्याला कुणीतरी जातंय. सरकारनं याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे. पावसाळ्याच्या आधी चौपदरीकरणाच्या कामास गती देण्यात येईल, असा आश्वासक सूर सार्वजनिक बांधकाम विभागाने वाजवला आहे. मात्र अनेक ठिकाणी काम रखडल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. कोकणवासीयांसाठी आणि पर्यटकांसाठी महत्त्वाचा असलेला मुंबई-गोवा महामार्ग आता ‘मृत्यू महामार्ग’ ठरत असल्याची स्थिती आहे. अपघातांची संख्या पाहता तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करून सुरक्षेची हमी देणे अत्यावश्यक झाले आहे.

 

Tags: महामार्गमहाराष्ट्रमुंबई - गोवा महामार्ग
ShareSend
Previous Post

ना. उदय सामंत यांची शिष्टाई सफल, बच्चू कडूंचं उपोषण स्थगित

Next Post

शालेय साहित्य ठराविक विक्रेत्याकडून खरेदीची सक्ती करणाऱ्यांवर कारवाई करा : सुराज्य अभियान

yogesh

yogesh

Related Posts

तळकोकणाच्या माथी अणुऊर्जा प्रकल्प!
माझं कोकण

तळकोकणाच्या माथी अणुऊर्जा प्रकल्प!

May 19, 2026
नाणार बॉक्साईट प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा कायम : उबाठा शिवसेना
माझं कोकण

नाणार बॉक्साईट प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा कायम : उबाठा शिवसेना

May 14, 2026
माझा शब्द, हेच वचन! उक्तीचा राजापूरवासीयांना प्रत्यय
माझं कोकण

आ. किरण सामंत यांच्या पुढाकाराने नाणार बॉक्साईट सुनावणी रद्द!

May 11, 2026
भाजपकडून निष्ठेचे फळ, प्रमोद जठार यांना विधानपरिषदेचे बळ!
माझं कोकण

भाजपकडून निष्ठेचे फळ, प्रमोद जठार यांना विधानपरिषदेचे बळ!

April 28, 2026
Next Post
शालेय साहित्य ठराविक विक्रेत्याकडून खरेदीची सक्ती करणाऱ्यांवर कारवाई करा : सुराज्य अभियान

शालेय साहित्य ठराविक विक्रेत्याकडून खरेदीची सक्ती करणाऱ्यांवर कारवाई करा : सुराज्य अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us